बिलोली (ता.प्र.) शेतकऱ्यांच्या अनूदानासाठी राजू पाटील शिंपाळकर यांनी दुसऱ्यांदा आंदोलन केले या पुर्वि 2016 च्या पिक विमा संदर्भात धरणे आंदोलन केले होते. ते नेहमीच गोर गरिब शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याचे काम करत आहेत.
दि २६ जानेवारी रोजी सप्टेंबर महिण्यात झालेल्या अतिवृष्टी अनुदान नुकसानीचे चुकीचे सर्वेक्षण करुन शेतक-यांवर अन्याय केल्याच्या निषेधार्त आज दि.२६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी अ.भा.भ्र.नि.समिती व तालुक्यातील शेतक-यांच्या वतिने तहसिल कार्यालया समोर एक दिवसिय ठिय्या आंदोलन पुकारण्यात आले होते. यात तालुक्यातील शेकडो शेतक-यांनी उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदविला. प्रमुख मागण्याचे निवेदन तहसिलदार यांच्या मार्फत मुख्यमंञ्याकडे करण्यात आले.या प्रमुख मागण्यात १)अतिवृष्टी अनुदान सर्वेक्षणात चुकीचे आव्हाल सादर करुन शेतक-यांवर अन्याय करणाऱ्या संबधिताना निलंबित करावे २) अन्यग्रस्त शेतक-यांची पुरवणी यादि करुन लाभ द्यावा ३)गत वर्षातील जाहिर प्रति हेक्टरी ६८००रु.दुष्काळी अनुदान वाटप करावे तसेच गत वर्षातील पिक विमा देण्यात यावा आदी मागण्याचे निवेदन देण्यात आले.तसेच या बाबत तात्काळ कार्यवाही न झाल्यास तिव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही निवेदनात देण्यात आला आसुन यावेळी अनेक मान्यवरांनी आपल्या मार्गदर्शनातुन प्रशासनाच्या विरोधात जाहिर निषेधाच्या भावना व्यक्त केल्या .सदर आंदोलनात बालासाहेब पाटील खतगावकर जि.प.सदस्य प्रतिनिधी गणेश पाटील शिंपाळकर,सिमावर्ती समन्वय गोविंद मुंडकर ,गंगाधर प्रचंड,गंगाधर गटुवार संभाजी ब्रिगेड जिल्हाअध्यक्ष बालाजी पाटील शिंदे भा.ज.प.तालुका अध्यक्ष श्रिनिवास नरवाडे,सरपंच संघटनेचे मा.तालुका अध्यक्ष प्रभाकर पेंटे,कांतु देसाई, गंगाधर पा.शिरोळे,प्रहार संघटनेचे गणेश हांडे किसान सेनेचे तालुका प्रमुख जेजेराव पाटील,शांतेश्वर पा.लघुळकर आनंदराव बिराजदार,गंगाधर पा.नरवाडे,शांतेश्वर काळे,दतु कोटनोड ,बालाजी पा.रामपुरकर ,इब्राहिम शेख,दत्तु पा.माडे,सुर्यकांत पा.शिंदे ,संदिप कठारे,शंकर गायकवाड , बालाजी नाईक ,विठ्ठल तुकडेकर,राजु मंधरणे,शेट्टीबा सोनकांबळे ,सुभाष काळे,गंगाधर धनुरे,याच्यांसह आनेक शेतकरी व विविध पक्ष, संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते पञकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा