बिलोली शेतात काबाड कष्ठ करणारे गरिब शेतकरी कधीच आपल्या आई वडीलांना वृद्धाश्रमात ठेवल्याचे एकावयास मिळत नाही.माञ शिक्षण घेऊन मोठे झालेले नौकरी करणारे पती पत्नी माञ आपल्या आई वडिलांना वृद्धाश्रमात ठेवतात.त्यामुळे शिक्षण जरी गरजेचे असले तरी शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांवर संस्कार केले तर शिक्षणाला महत्त्व आहे.असे प्रतिपादन बिलोलीचे जेष्ठ पञकार गोविंद मुंडकर यांनी केले.
ते दि.३० जानेवारी रोजी बिलोली तालुक्यातील अंजनी येथील जिल्हा परिषद शाळेत कै.कलावतीबाई व कै.गंगाराम पा.हांडे यांच्या स्मृती पित्यार्थ आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभात बोलत होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नायगावच्या ज्यु.काँलेजचे प्राचार्य शंकरराव पा.अंजनीकर यांची तर प्रमुख पाहूने म्हणून जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मण ठक्करवाड,संजय बेळगे, दत्तराम बोधने ,गावच्या सरपंच निर्मलाबाई हांडे,केंद्रमुख येसगे, ग्रामसेवक ताडकुले आदींची प्रमुख उपस्थिती होती.सदर कार्यक्रमात शिष्यवृत्ती सह विविध विषयात प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा उपस्थित उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी कार्यक्रमाचे आयोजक गोविंद पा.हांडे,दत्ता पा.हांडे,महेश हांडे,गावंडे यांच्यासह गावातील महिला,पुरूष,विद्यार्थी व शाळेतील शिक्षक उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा