०७ फेब्रुवारी २०२०

शिराढोण ते नांदेड मार्गांवर धावतात दे धक्का बसेस



जीव मुठीत धरून प्रवासी करतात प्रवास

शिराढोण (शुभम डांगे)
कंधार तालुक्यातील शिराढोण येथे  जिल्ह्यच्या ठिकाणाहून ये -जा करण्यासाठी दिवसभरातून 7 ते 8 बसेस आहेत परंतु सर्व बस भंगार येणारी बस हि शिराढोण पर्यंत येईल याची खात्री नाही तर शिराढोण वरून जाणारी नांदेड पर्यंत जाईल याची खात्री नाही त्यामुळे या सर्व प्रकारचा नाहक त्रास गावातील व परिसरातील जनतेला व दररोज जिल्ह्यच्या ठिकाणी जाणाऱ्या शासकीय कर्मचारी, विध्यार्थी वर्ग यांना हा त्रास सहन करावा लागतो बस बंद  पडल्यावर चालकाच्या विनंतीवरून प्रवासी व विद्यार्थ्यांनी बसला धक्का देतात . मात्र बस सुरू करण्याचा हा प्रयत्न एखादी वेळेस असफल ठरतो . नांदेड विभागाला माहिती दिल्यावर दुसरी बस बोलविण्यात येते . प्रवासी व विद्यार्थ्यांना मात्र गावापर्यंत पायपीट करावी लागते . गावात भंगार बसेस सोडू नये अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.
            या बस आता जुनाट झाल्या असून त्यांची देखभाल दुरुस्ती वेळच्या वेळी केली जात नाही. परिणामी, बसची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. या 25 किलोमीटरच्या अंतरात खासगी वाहनांना त्यांच्या मनाप्रमाणे भाडे देणे प्रवाशांना परवडत नाही . त्यामुळे प्रवाशांना  याच बसमधून प्रवास करण्याशिवाय पर्याय नाही. सध्या या बसचा आवाज हेलीकॉप्टरसारखा मोठा येत आहे. काही बस गळथ आहेत. बसमधून निघणाऱ्या धुरामुळे प्रदूषण वाढत असल्याची शंका प्रवाशी व्यक्त करतात. बसची अवस्था पाहून प्रवाशी सह विध्यार्थी वर्ग, शासकीय कर्मचारी नाराजी व्यक्त करत आहेत. ‘प्रशासनाकडून बसची देखभाल होत नसल्याचे दिसते. यामुळे प्रवाशांना  भंगार बसमधून प्रवास करावा लागतो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

बातम्या

सोयाबीन व कापूस या पिकांचे मोठ्या नुकसान झाले आहे या दोन पिकांसाठी सरसकट विमा लागू करावा- पांडूरंग शिंदे

               नांदेड जिल्ह्यातील विशेषतः नायगाव तालुक्यातील परतीच्या पावसाने हातात आलेले पीक गेल्याने शेतकरी हावादीन झाला आहे, दिवाळीच...