नांदेड :- महाराष्ट्र राज्य पद्मशाली कर्मचारी संघटनेतर्फे दि. 29 जून 2025 (रविवार) रोजी शुभारंभ मंगल कार्यालय, लेबर कॉलनी नांदेड येथे 200 गुणवंत विद्यार्थी सत्कार, 30 नवनियुक्त,15 पदोन्नत - 15 सेवानिवृत्त कर्मचारी सत्कार कार्यक्रम संपन्न झाला.
सदरील कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून माननीय तुळशीदास भुसेवार अध्यक्ष गोदावरी सोसायटी नांदेड , स्वागताध्यक्ष राजेश यन्नम मा. नगरसेवक नांदेड वाघाळा महानगरपालीका, विशेष अतिथी प्रसिद्ध विधिज्ञ ॲड.डॉ.रामदास सब्बन प्रसिद्ध वकील मुंबई हायकोर्ट, प्रा. बालाजी कोंपलवार माजी उपप्राचार्य तथा वैधानिक विकास मंडळाचे सदस्य, प्रकाशभाऊ मारावार महानगर प्रमुख शिवसेना नांदेड, उद्योजक विजय भंडारे संचालक भवानी ऍग्रो प्रा. ली. हैद्राबाद, विजय कुरुंदकर कार्यकारी अभियंता नांदेड, ईश्वर येमुल दि. टाऊन मार्केट सोसायटी नांदेड, रोहितसेठ ( शास्त्री) अडकटलवार अध्यक्ष महाराष्ट्र युनायटेड पद्मशाली संघम हैद्राबाद, जगन्नाथ बिंगेवार अध्यक्ष मराठवाडा युनायटेड पद्मशाली संघम हैद्राबाद, महेंद्र दासरवार सचिव मराठवाडा युनायटेड पद्मशाली संघम, सौ. प्रणिता वसमतकर मराठवाडा महिला अध्यक्ष युनायटेड पद्मशाली संघम, नंदकिशोर अडकटलवार युवक जिल्हाध्यक्ष युनायटेड पद्मशाली संघम नांदेड, उमेश कोकुलवार प्रौढ जिल्हाध्यक्ष युनायटेड पद्मशाली संघम हैद्राबाद, सिताराम म्यानेवार उपाध्यक्ष नगरपरिषद वसमत, कु. तेजस्विनी मनोज तालेवार फिल्म अभिनेत्री अहमदाबाद गुजरात, रविंद्र कोमटी अध्यक्ष पद्मशाली संघम गंगाचाळ नांदेड, विजय रच्चेवार अध्यक्ष पद्मशाली प्रतिष्ठान पुणे, सुभाष बल्लेवार संचालक गोदावरी सोसायटी नांदेड, प्रा. गोविंद रामदीनवार, मल्लेश बल्ला पद्मशाली समाज संघटना नांदेड (उत्तर) माजी तालुकाध्यक्ष, शिवशंकर सिरमेवार पोलीस पाटील, मल्लेशम मंतुरी, संतोष कोंकलवार यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरूवात महर्षी मार्कंडेय ऋषीच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन व दीप प्रज्वलन करून करण्यात आले. सर्व मान्यवरांचे शाल, हार, मोमेंटो देऊन सत्कार करण्यात आला.
यानंतर संघटनेचे राज्याध्यक्ष नागभूषण दुर्गम यांनी प्रास्ताविक मांडले. मान्यवरांनी आपले विचार मांडले व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
महाराष्ट्र राज्य पद्मशाली कर्मचारी संघटनेतर्फे यावर्षीचा पद्मशाली समाज भुषण पुरस्कार-2025 प्रसिद्ध उद्योजक तथा अखिल भारतीय युनायटेड पद्मशाली संघमचे उपाध्यक्ष माननीय गोपालसेठ किशनराव गोरंट्याल यांना देऊन गौरव करण्यात आला. करिअर मार्गदर्शक सुरेश कटकमवार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यानंतर इयत्ता 10 वी, 12 वी 70% पेक्षा जास्त गुण घेणारे विद्यार्थी, NEET, IIT, NIT प्रवेश पात्र,5 वी 8वी शिष्यवृत्ती धारक, जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश पात्र गुणवंत विद्यार्थी तसेच नवनियुक्त, पदोन्नत व सेवानिवृत्त कर्मचारी यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी होत प्रचंड प्रतिसाद दिला. कार्यक्रमासाठी आलेल्या समाज बांधव यांच्या स्नेह भोजनाची व्यवस्था प्रसिद्ध उद्योजक, दानशूर व्यक्तीमत्व, हॉटेल मंजु पॅलेसचे मालक नंदकिशोर अडकटलवार मंजुवाले यांनी केली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संघटनेचे संतोष गुंडेटवार, शंकरराव कुंटूरकर, गणेश भूसा, नरसिंग गुर्रम, नरसिमलू वंगावार, सूर्यकांत दासरवार, विजय चरपिलवार, नारायण अडबलवार, प्रा. विजय उपलंचवार, सत्यजीत टिप्रेसवार, व्यंकटेश पुलकंठवार, सचिन रामदीनवार संतोष ताडेवार, नरसिंग जिडेवार, विनोद रामदीनवार, विजय रामदीनवार, राजेश दाचावार, धोंडीबा तेलेवार, संतोष गुम्मलवार, सत्यपाल मेका, नाथा गंगूलवार, श्याम चिलकेवार, राम चिलकेवार,विजय रामदिनवार, गणेश यल्लेवार, प्रकाश ताटकोंडवार आदींनी मेहनत घेतली.
अतिशय आनंदात व उत्साहात कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संघटनेचे उपाध्यक्ष शंकरराव कुंटूरकर व नारायण अडबलवार यांनी केले. आभार जिल्हाध्यक्ष विजय चरपिलवार यांनी मांडले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा