०६ ऑक्टोबर २०२५

भारतीय जनता पक्षावतीने नगराध्यक्ष पदाचे प्रबळ दावेदार डॉ कुडमुलवार



"यह पब्लिक है सब जानती है."

कुंडलवाडी प्रतिनिधी

कुंडलवाडी नगर परिषद सार्वत्रिक निवडणुक २०२५ साठी दि.6 ऑक्टोबर रोजी मुंबई येथील 

मंत्रालयात नगराध्यक्ष पदाचे आरक्षण नूक्तेच जाहिर झाले.नगराध्यक्ष पद सर्वसाधारण  प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आले.

नगराध्यक्ष पदाचे आरक्षण जाहीर होताचा नगराध्यक्ष पदाचा मिच दावेदार म्हणून स्वताहून काहीजण बोलत आहे.खरे नगराध्यक्ष पदाचे दावेदार माजी न.प.उपाध्यक्ष डाॅ.विठ्ठल कुडमूलवार हेच आहे.अशी प्रतिक्रिया जनसामान्यातून उमटत आहे.कारण "यह पब्लिक है सब जानती है."

*डॉ. विठ्ठलराव कुडमुलवार — जनतेच्या मनातील नेता, भाजपाचे प्रबळ नगराध्यक्ष पदाचे पुन्हा एकदा दावेदार*

विकास आणि माणुसकीचा संगम म्हणजे डॉ. विठ्ठलराव कुडमुलवार. नगराध्यक्ष म्हणून त्यांनी शहराच्या सर्वांगीण विकासाला गती दिली. घरकुल योजना, रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटीकरण, स्वच्छता मोहिम,वृक्षारोपण,आणि नगरपालिकेच्या उत्पन्नवाढीत त्यांचा सिंहाचा वाटा आहे.

त्यांच्या कार्यकाळात नागरिकांना थेट संपर्क, तत्काळ निर्णय आणि पारदर्शक प्रशासनाचा अनुभव मिळाला. सामाजिक, धार्मिक व शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी सतत योगदान दिलं. विद्यार्थ्यांना मदत, दिव्यांगांना सहाय्य आणि वाद मिटवण्यात त्यांनी मानवतेचा आदर्श निर्माण केला.

भारतीय जनता पक्षाचं कमळ कुंडलवाडीत फुलवणारे दुसरे नगराध्यक्ष म्हणून त्यांनी ओळख निर्माण केली.

जनतेचा विश्वास आणि विकासाची दृष्टी यामुळे आजही लोक अभिमानाने म्हणतात.

*“ हृदयावर राज्य करणारे नेता म्हणजे डॉ. विठ्ठलराव कुडमुलवार.”*

२९ सप्टेंबर २०२५

कुंडलवाडीत नारीशक्ती रॅलीस महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

 

*उपजिल्हाधिकारी क्रांती डोंबे यांच्या हस्ते झेंडा दाखवून रॅलीची सुरूवात.


*सपोनि.ज्ञानेश्वर शिंदे यांचा स्तुतीतुल्य उपक्रम 

कुंडलवाडी प्रतिनिधी

पोलीस ठाणे कुंडलवाडी आणि महिला दक्षता समितीचा वतीने स्त्रियांच्या सन्मानार्थ,महिला सबलीकरणार्थ तसेच महिला जनजागृतीसाठी,समाजामध्ये महिलांना मानसन्मान वाढण्यासाठी तसेच पोलिस ठाणे हद्दीतील महिला निसंकोचपणे आपल्या आडचणी 

पोलिसांना किंवा महिला दक्षता समितीला सांगावे

त्यानिमित्ताने दि.२९ सप्टेंबर रोजी सकाळी ११=०० वाजता शहरातील प्रमुख मार्गावरून 

नारीशक्ती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.नारीशक्ती रॅलीस महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभले.

उपजिल्हाधिकारी क्रांती डोंबे यांच्या हस्ते

हिरवाझेंडा दाखवून रॅलीची सुरूवात करण्यात आली.यावेळी नायब तहसीलदार रघुनाथसिंह चौहान,तलाठी पवन ठकरोड,वैद्यकीय अधिकारी डाॅ.अनमुलवाड सारीका,मा.नगराध्यक्ष सुनील बेजगमवार,सोसायटीचे माजी.चेअरमन साईनाथ उत्तरवार,डाॅ.प्रशांत सब्बनवार,सपोनि.ज्ञानेश्वर शिंदे,महिला दक्षता समितीचे पदाधिकारी पत्रकार आदी उपस्थित होते.

रॅलित अनेक ठिकाणी के.रामलू पब्लिक स्कूल चा विद्यार्थ्यांनी पहिली महिला डाॅक्टर डाॅ.आनंदीबाई जोशी यांच्या जिवनीवर लघु नाट्य सादर केले.तसेच कै.गंगाबाई पोतन्ना सब्बनवार माध्यमिक विद्यालयाची विध्यार्थीनी कु.आरती मोकळे यांनी महिला शक्तीपर आपले विचार मांडले.तसेच कुंडलेश्वर मंदिर येथे हभप.कानोपात्रा ताई यांनी महिलांचा सन्मानार्थ आपले विचार मांडले.

वैद्यकीय अधिकारी डाॅ.अनमुलवाड सारीका यांनी

आरोग्य विभागाचा वतीने राबविण्यात येत असलेल्या"स्वस्थ नारी-सशस्त परीवार"अभियांचा लाभ उपस्थित महिलांनी घ्यावे.असे आवाहन केले.

मा.नगराध्यक्ष सुनील बेजगमवार,सोसायटीचे माजी.चेअरमन साईनाथ उत्तरवार,डाॅ.प्रशांत सब्बनवार,आदींनी सपोनि.ज्ञानेश्वर शिंदे व महिला दक्षता समितीचा वतीने महिलांमध्ये जनजागृती निर्माण करण्याचा उद्देशाने शहलात प्रथमच काढण्यात आलेल्या नारीशक्ती रॅली बद्दल सपोनि.ज्ञानेश्वर शिंदे यांचे कौतुक केले.यावेळी दक्षता समितीचे उपाध्यक्ष 

सौ.ज्योती लाडे म्हणाले दक्षता समितीचा माध्यमातून पोलिसांचा मदतीने नक्कीच महिलाना  न्याय मिळवुन देण्यात येईल असे अश्वासन दिले.

तसेच यावेळी सपोनि.ज्ञानेश्वर शिंदे म्हणाले,महिलांवर अन्याय अत्याचार होत असेल तर ते सहन न करता ११२,१०९१ या पोलिस मदत क्रमांकाशी संपर्क करावे.असे आवाहन केले.


रॅलीत समाजिक कार्यकर्ते जेष्ठ मा.नगरसेवक पंढरीनाथ दाचावार यांच्या वतीने बिस्कीट व पाणी वापट करण्यात आले.तसेच विश्वनाथ दाचावार,गंगाप्रसाद गंगोणे,महेश तांडूलवार यांच्यावतीने पाणी वाटप करण्यात आले.रॅलीत दक्षता समितीचे अध्यक्ष संगीता मेरगेवार, उपाध्यक्षपदी ज्योती लाडे,अनुराधा कांबळे डाॅ.लीला लखमपूरे,अर्चना पोतनकर,रोहिणी गुंडाळे,सिमा कत्तुवार,शेख शबाना बेगम मोहम्मद अफजल,स्मिता दाचावार,सारिका सब्बनवार,अंजुषा दाचावार,रेखा कुंडलवाडीकर, मीना कोनेरवार, कमल जिठावार,गायत्री तुंगेनवार,संध्या माहेवार,सावित्रा समेटवार,अंशूमती उत्तरवार आदींसह शहरातील पत्रकार,प्रतिष्ठीत नागरीक,महिला,जिल्हा परिषद हायस्कूल,कै.गंगाबाई पोतन्ना सब्बनवार विद्यालय,माध्यमिक ऊर्दू विद्यालय,के.रामलू पब्लिक स्कूल,संत गोरोबा विद्यालय आदी शाळेचे विध्यार्थी शिक्षिका,पोलिस कर्मचारी,पोलिस पाटील मोठ्यासंख्येत उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डाॅ.नरेश बोधनकर,संतोष पाटील शिवशट्टे यांनी केले. सांगता सामुहिक राष्ट्रगीत पठण करून करण्यात आले.उपस्थीतांचे आभार पोउनी.गजेंद्र मांजरमकर यांनी मानले.

सपोनि.ज्ञानेश्वर शिंदे यांनी वाचवले महिलेचे प्राण



पोलिस आणि दक्षता समितीचा समुपदेशाने महिलेचे मन परिवर्तन.

कुंडलवाडी प्रतिनिधी

कुंडलवाडी पोलिस ठाणे हद्दीतील अर्जापुर येथील एका ४५ वर्षीय महिला शेळगाव (थडी) गोदावरी नदीवरून उडी मारून आत्महत्या करण्यास गेली असताना यासंदर्भात माहिती प्रथमदर्शी नागरीकांनी पोलिसांना दिली.माहिती मिळताच  सपोनि.ज्ञानेश्वर शिंदे यांनी सबंधीत ठिकाणी पोहचून वाचविले महिले प्राण.

हि घटना दि.२७ सप्टेंबर रोजी सायंकाळी  सहा वाजता घडली आहे. कुंडलवाडी पोलीस व महिला दक्षता समितीने महिलेची समजुत घालून त्यांना कुटुंबाच्या स्वाधीन केले.

कुंडलवाडी पोलिस ठाणे हद्दीतील असलेल्या अर्जापुर गावातील पंचशीला लालू कांबळे (४५ वर्ष) हि महिला आपल्या २ मुली व एक मुला सोबत राहते.नवरा मयत आहे.दि.२७ सप्टेंबर रोजी कौटुंबिक वादातून महिला शेळगाव (थडी) जवळील गोदावरी नदीवरून उडी मारून जीव देण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी तेथून जात असलेल्या लोकांनी नदीच्या पुलावर महिला दिसल्याने महिलेकडे विचारपूस केली.महिलेने मला जगायच नाही. मला आत्महत्या करायची आहे. असे उत्तर दिल्याने काही लोकांनी हि बाब कुंडलवाडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर शिंदे यांना दिली.तात्काळ शेळगाव (थडी) येथे सपोनि.शिंदे पोहचून महिलेस आत्महत्या करण्यापासून प्रावृत केले.

तेथून महिलेस पोलिस ठाण्यात आणण्यात आले.

सपोनि.ज्ञानेश्वर शिंदे,महिला पोलिस कर्मचारी अरूणा श्रीवास्तव,महिला दक्षता समितीचे अध्यक्षा संगीता मेरगेवार,उपाध्यक्षा ज्योती लाडे,अनुराधा कांबळे,स्मिता दाचावार,अंजूषा दाचावार यांनी समुपदेशन करून महिलेस तिच्या आईच्या स्वाधीन करण्यात आले. कुंडलवाडी पोलीसांनी आत्महत्या करण्यास निघालेल्या महिलेचा जीव वाचविले. पोलिस आणि दक्षता समिती चा समुपदेश महत्वाचा ठरला.

कुंडलवाडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर शिंदे आणि दक्षता समितीने

 केलेल्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

२८ सप्टेंबर २०२५

कुंडलवाडीत नारीशक्ती रॅलीचे आयोजन.

कुंडलवाडी प्रतिनिधी


दि.२९ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी १०.०० वाजता पोलीस स्टेशन कुंडलवाडी तर्फे स्त्रियांच्या सन्मानार्थ, महिलांच्या सबलीकरणार्थ तसेच जनजागृतीसाठी विशेष नारीशक्ती रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.

या रॅलीची सुरूवात कुंडलवाडी पोलीस ठाण्यातून होणार असुन येथून दस्तगीर चौक,चौक,नवरंग जवळ पथनाट्य होणार येथून जोड मारुती चौक,कुंडलेश्वर मंदिर येथे पथनाट्य,राम मंदिर पासुन बँक ऑफ बडोदा,डाॅ.हेडगेवार चौक येथे पथनाट्य सादर होणार येथून नगरपरिषदेत रॅलीचे समारोप होणार आहे.

या रॅलीत सौ.अर्चना पाटील मॅडम अपर पोलीस अधीक्षक, भोकर,सौ. क्रांती डोंबे मॅडम उपविभागीय अधिकारी, बिलोली,श्री.दशरथ पाटील सर उपविभागीय पोलीस अधिकारी, धर्माबाद यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.या रॅलीत महिला दक्षता समितीचे पदाधिकारी सदस्य तसेच शहरातील शालेय विध्यार्थीनी महिला शिक्षिका आदींसह शहरातील मोठ्याप्रमाणात महिलांचा सहभाग लाभणार आहे.सदर नारीशक्ती रॅली ही प्रबोधनात्मक व जनजागृतीपर असून, समाजात महिलांच्या सन्मानाबाबत सकारात्मक संदेश देणारी ठरणार आहे.तरी रॅलीत शहरातील मोठ्याप्रमाणात महिला व विध्यार्थीनी

उपस्थित राहावे.असे आवाहन कुंडलवाडी पोलिस ठाण्याचे सपोनि.ज्ञानेश्वर शिंदे यांच्यावतीने करण्यात आले.

२० सप्टेंबर २०२५

स्वस्थ नारी, सशक्त परिवार " अभियान अंतर्गत मालेगाव येथे कार्यक्रम संपन्न

 " 



नांदेड :- तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ श्रीकांत देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक आरोग्य केंद्र मालेगाव येथे आज दिनांक २० सप्टेंबर रोजी

"स्वस्थ नारी सशक्त परिवार" प्राथमिक आरोग्य केंद्र मालेगाव येथे स्वस्थ नारी सशक्त परिवार या अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन मौजे मालेगाव येथील लोकप्रतिनिधींच्या  हस्ते स्त्री शक्तीचे प्रतीक राष्ट्रमाता जिजाऊ व क्रांतीज्योती सावित्रीमाई यांच्या प्रतिमांचे पूजन करून दिप प्रज्वलनाने करण्यात आले.

आज रोजी आयोजित करण्यात आलेल्या " स्वस्थ नारी सशक्त परिवार " या अभियानामध्ये मालेगाव व परिसरातील गृहिणी, विद्यार्थिनी, गरोदर माता, वयस्क महिला या सर्व गटातील लाभार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. या प्रसंगी लाभार्थ्यांना स्त्रीरोग विशेषज्ञ , अस्थिरोग विशेषज्ञ, दंतशल्य चिकित्सा, क्षयरोग तपासणी, प्रयोग शाळेतील इतर रक्त तपासण्या इत्यादी वैद्यकीय सेवा पुरवण्यात आल्या.  जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. सतीश कोपुरवाड, अर्धापूर तालुक्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. श्रीकांत देसाई यांच्या मार्गदर्शनात ग्रामीण रुग्णालयाच्या स्त्रीरोग तज्ञ डॉ. बोकारे मॅडम, अस्थिरोग तज्ञ डॉ. मोरे सर, दंतशल्यचिकित्सक डॉ.मोरे सर, डॉ. श्याम सावंत सर व डॉ.रोहिणी जाधव मॅडम यांच्या चमूने उपस्थित लााभार्थ्यांना आरोग्य सेवा व आरोग्य शिक्षण प्रदान केले. उपरोक्त अभियान यशस्वी करण्यासाठी डॉ. शाम सावंत व डॉ जाधव मॅडम यांच्या मार्गदर्शनात  डॉ गवळी, प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य निरीक्षक अरुण गादगे,  मोरडे पाटील, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी राजकुमार इंगळे, सोनवणे,चौधरी,अजय देवकरे, एस. बंडे,शिरसाट ताई, निकिता अच्युते, आरोग्य कर्मचारी संदीप मांजरमकर, श्रीकांत कछवे, पवार, इंगोले, चव्हाण ताई,संगीता गिराम, गुंडले, अनिता कोटमवाड, बोलकर, भाले, गंगातीरे मामा, जब्बार भाई, वाहन चालक सूर्यवंशी मामा, सर्व आशा ताई समस्त कर्मचाऱ्यांनी विशेष परीश्रम घेतले.

१४ सप्टेंबर २०२५

ईद ए मिलादुन्नबी जुलुस ए मोहम्मदी नरसी येथे मोठ्या उत्साहात संपन्न



नायगाव ता प्रतिनीधी :- सय्यद अजिम नरसीकर 



 इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मोहंमद पैगंबर जन्म दिनानिमित्त .नायगाव तालुक्यातील नरसी येथे ईद-ए-मिलादुन्नबी अनुषंगाने.जुलूस -ए मोहम्मदी मोठ्या जल्लोषात काढण्यात आला. यावेळेस मुस्लिम बांधवांसोबतच लहान मुले व मुली जुलूस मध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले.यावेळेस मुस्लिम धर्म गुरूवर्य नुरानी मस्जिद इमाम खारी शाहेद रजा.नुरानी मस्जिद सदर हाजी हाफीज उस्मान साब. नात खा खारी शाहिद हुसैन नुरी.हुबली कर्नाटक याच्या नात वाचन करत होते.यावेळेस प्रमुख उपस्थितीत नायगांव पंचायत समितीचे माजी सभापती श्रावण पाटील भिलवंडे.काँग्रेस जिल्हाउपाध्यक्ष संभाजी पाटील भिलवंडे.पोलिस पाटील इब्राहिम बेग पटेल.काँग्रेस अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष सय्यद इसाक भाई.शिवसेना उद्धव ठाकरे गट तालुकाप्रमुख रविंद्र शिवाजीराव पाटील भिलवंडे.सरपंच गजानंन शिवाजीराव पाटील भिलवंडे.उपसरपंच प्रतिनीधी अलीम बेग पटेल. ग्रामपंचायत सदस्य सय्यद ईस्माईल, सय्यद पिर साब , ग्रामपंचायत सदस्य रफीक शेख. ग्रामपंचायत सदस्य प्रतिनीधी रफीख पठाण.ग्रामपंचायत सदस्य प्रतिनीधी मोहीयोदीन सर. जावेद भाई कुरेशी. रफीक पटेल. माजीत भाई. लाला हबिबसाब कुरेशी. पत्रकार सय्यद अजिम हाजी हुसेनसाब. जुलूस ए मिलादुन्नबी निमित्त मिरवणूक मध्ये शुभेच्छा दिले.सदर जुलूसला रामतीर्थ पोलिस निरीक्षक विक्रम हराळे . सपोनी नरवाडे.नरसी बिट जमादार सोनकांबळे.जमदार जाभळेकर . पोलिस कर्मचारी बेळीकर . चौक बंदोबस्त ठेवण्यात आले होते.नरसी चौकात काँग्रेस अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष सय्यद इसाक भाई याच्या वतिने प्रमुखचे शाल व पुष्पहार घालून सत्कार करण्यात आले.जशने ईद ए-मिलाद-उन नबी मुबारक निमित्त सर्व मुस्लिम बांधवांना वंचित बहुजन युवा आघाडीच्या व गणेश अशोकराव कोत्तेवार होटाळकर वतिने नरसी चौक येथे पाणी बॅाटल वाटप करण्यात आले आहे ,तरी नरसी नायगांव शंकर नगर. अजनी. रामतीर्थ. कुंचली किनाळा.हिपरगा. येथील सर्व समाज बांधवांनी कार्यक्रमास उपस्थित होते. आपना जुस सेंटर च्या वतिने शेरबत व केळी वाटप करण्यात आले.नांदेड रोड येथील रहेमान शेख खलील शेख यांच्या वतीने शेरबत चे  देण्यात आले . जुलूस- ए- मोहम्मदी नरसी जुनेगाव येथून निघून नरसी चौक नांदेड रोड जिगळा मगदूम नगर. हजरत खाकीशाह दर्गा येथे दुवा होऊन समाप्त झाले ईदगाह मैदान येथे महाप्रसाद चा आयोजन केले होते.आयोजक मजहर सर. जलील खुरेशी. आमीन सेट.हाजी मैनोद्दीन खुरेशी. यांनी केले.सय्यद आरीफ सर .युसुफ शेठ,शेख वसीम सेठ.असलम पटेल.सय्यद भाई, ईद-ए 'मिलादुन्नबी जुलुस कमेटी चे सदर हाजी एजाज रजा बागवान,सलीम शेख ,इमरान कुरेशी,सय्यद वसीम, इमरान पठान, दानिश शेख, बाबजी,अहेमद लगास ,तोफीक शेख, सादीक शेख, ऊबेद रजा, जाफर रजा, आरीफ बागवान, आवेस,तोफीक,अजहर ,अशफाक, सय्यद खलील.मुबारक शेख. साकीब,अक्रम,अरबाज,ईमरान,वसीम,फुरखान, बाबा,सोनु,आदील, शबुजी,शोएब, हाफीज, अल्ताफ, निसार, फैजान  रहीम ,सय्यद अलीम सय्यद आदम.सय्यद मोईन. शफी मनियार.शेख फेरोज.मुबारक सय्यद. यासह गावातील जेष्ठ श्रेष्ठ प्रतिष्ठित नागरिक व नवयुवकांची लक्षणीय उपस्थिती होती.सदर जुलूस यशस्वितेसाठी जुलूस कमेटीचे सर्व सदस्यांची अथक परिश्रम घेतले.

११ सप्टेंबर २०२५

कुंडलवाडीत ईद -ए-मिलादून्ननबी मिरवणूक उत्साहात व शांततेत

 


 

*अनेक ठिकाणी फळ,शरबत व महाप्रसाद वाटप.

*मिरवणूकीत जवळपास तीन हजार मुस्लिम बाधवांचा समावेश होता.

कुंडलवाडी प्रतिनिधी 

ईस्लाम धर्माचे शेवटचे प्रेषित मो.पैगंबर(स.अ) जयंती ईद -ए-मिलादून्ननबी निमीत्त नौजवानाने अहेले सुन्नतुल जमात,जशने ईद -ए -मिलादुन्नबी,मुन्वर मस्जिद कमेटी व शहराती मुस्लिम समाजबांधवांच्या वतीने शहरातून जुलूसे मोहम्मदी कढण्यात आले मिरवणूकीत अनेक ठिकाणी फळ,बिस्कीट,पाणी

शरबत वाटप तर मुन्वर मस्जिद येथे मुस्लीम समाज बांधव तर्फे महाप्रसाद वाटप कार्यक्रम घेण्यात आले.मिरवणूकीत तीन हजार मुस्लिम बाधवांचा समावेश होता.

शहरात दरवर्षा प्रमाणे याही वर्षी मो.पैगंबर(स.अ) जयंती ईद -ए-मिलादून्ननबी निमीत्त मुस्लिम बांधवा तर्फे शहरातील मुख्यमार्गावरूण जयंती मिरवणूक काढण्यात आली.या मिरवणूकीची सुरूवात येथील मुन्वर मस्जिद येथून सकाळी ठिक 10=00 वाजता करण्यात आली शेख शपाशावली दर्गा येथे फातीया खानी नंतर मिरवणूकीची सांगात झाली.या मिरवणूकीत हाफीज वसीम मिस्बाही,हाफीज अब्दुल माजीद साब,हाफीज अब्दुल समद साब,हाफिज मुस्ताख साब,हाफीज अब्दुल यासिन साब,अब्बु हाफीज साब,हाजी नवाबसाब मौलाना यांनी मिरवणूकीत नाते रसुल सादर केले.

मुस्लिम समाज बांधवातर्फे मिरवणूकी दरम्यान फळ,शलबत,बिस्कीट,पाणी आदी वापट करण्यात आले.

मिरवणूकीत मिलादून्नबी समिती अध्यक्ष मैनोदीन हाजी मगदुमसाब,हाजी इब्राहिम सेठ,ईदगाह समितीचे अध्यक्ष सय्यद मंसूरअली सुजातअली,उपाध्यक्ष मोहम्मद अफजल हाजी ईब्राहीमसाब,मुन्वर मस्जिद अध्यक्ष मोहम्मद नजिरसाब,उपाध्यक्ष नजिर पठाणसाब, मा.नगरसेवक शेख मुखतार खाजामियाॅ,मा.नगरसेवक शेख बासिद,नगरसेवक प्रतिनिधी शेख वहाब सिरजोदीन,खाजी शेख नसिर अहेमदहुसेन,मोहम्मद बागवान,अहेमद बागवान,शेख अजिम खाजामियाॅ,

शेख इसमाईल हाजी इब्राहिम साब,हाजी मियाँभाई खुरेशी,शेख जावेद बिल्डर,फसियोदीन हकीमसाब,पत्रकार शेख अलीम,रियाज पठाण,जलालखाॅन पठाण,पठाण पाशामियाॅ,

हाजी मुनीर मैनोदीन,शेख आसिफ भाई,मुजीब मोहीदीन,रज्जाख, बाबूमियाॅ,शरीफ महेबूब अली,सरफराज अहेमद,अफजल टेन्ट हाऊस,मुस्ताख बागवान,युसूफ अहेमद हुसेन,इरफान नजीर अहेमद,सलिम हाजीमियाॅ टेलर,जब्बार पाशामियाॅ,इम्रान बाबूमियाॅ,मुजीब पिरसाब,अदील बागवान,बाबा खुरेशी,ईब्राहीम खुरेशी,रफत खुरेशी,हैदरभाई बाॅम्बेवाले,एजाज खाजामियाॅ,पाशा बांबू मियाँ,तनवीर बाबूमियाॅ,

युनूस कबीरसाब असलम ईलेक्टेशन,शेख सद्दाम मचकुरी,शेख रिजवान सना साडी सेंटर,अमेर भाई,नबाब मोगल,युनूस मोगल, सलिम भाई नमकवाले,शेख शमशोदीन,अझर खुरेशी,सैफ खुरेशी,जावेद टेलर,पत्रकार अब्दुल माजिद,शेख गौस मोहिदीन,वहिद मेकॅनिक,फारूख टेलर,ईब्राहीम टेलर,महेबूब अयुब शेख,शेख फसी पलंबर,अश्शु कटलेरी,नजिर पलंबर,अश्शु ईलेक्टेशन,मसुद देसाई,ईम्रान मुनीर भाई,सुलतान पानवाले आदीसह नयाबादी,शतरंजीगल्ली,

बागवानगल्ली,खुरेशीगल्ली शहरातील मुस्लिम तरूण समाजाबांधव अबाल मुलमुली,जेष्ठ नागरीक सहभागी होते.

तसेच विद्युत वितरण कार्यालय कनिष्ठ अभियंता सुरेश गटुवार,तलाठी पवन ठकरोड,सायलू बंटवार मिरवणूकीत उपस्थित होते.

मिरवणूक शांततेत पारपाडावे, कायदा व सुव्यवस्था आबादीत नादावे यासाठी येथील पोलिस ठाण्याचे प्रभारी सपोनी.ज्ञानेश्वर शिंदे यांचासह दोन अधिकारी पोउनी.गजेंद्र मांजरमकर,पोउनी.उपेंद्र सोनेवने एस.आर.पी.

पलटून इनचार्ज सह २५ पोलिस अमलदार,३० गृहरक्षक दलजवान,१ एस.आर.पी.पलटून  बंदोबस्तीत सहभागी होते.

३१ ऑगस्ट २०२५

हरनाळी ,नागनी व हुनगुंदा गावात आरोग्य तपासणी

 हरनाळी व नागनी


गावात पूर परिस्थिती निर्माण झाली असल्यामुळे हूनगुदा गावात स्थलांतरित झालेले लोकांना आरोग्य तपासणी करण्यात आली व गावात आरोग्य शिक्षण देऊन सगळं गावातील हातपंप बोर यात टी.सी.एल टाकून पाणी शुद्धीकरण करण्यात व कंटेनर सर्वे करून अबेटिंग करण्यात आले  कीटकजन्य आजार जलजन्य आजार या बदल प्रतिबंधक उपाययोजना व उपचारत्मक उपाययोजना करण्यात आल्या यासाठी उपस्थित माननीय जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर देशमुख मॅडम व तालुक्याचे गटविकास अधिकारी पदमवार व तालुक्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर वाडेकर , डॉ सारिका अनमुलवाड मॅडम वैद्यकीय अधिकारी कुंडलवाडी सुपरवायझर यांनी उपस्थित राहून कामाचे पाहणी केली व उपकेंद्र हुनगुंदाचे आरोग्य कर्मचारी समुदाय आरोग्य अधिकारी डॉक्टर रुबिया मॅडम  तसेच आरोग्य सेवक शेखं अर्शद  आरोग्य सेविका साठे  सिस्टर व सर्व आशा यांचे कामाबद्दल कौतुक केले अभिनंदन दिले

२३ ऑगस्ट २०२५

एक हात मदतीचा’ : खुशी सेवाभावी संस्थेचा पूरग्रस्तांना दिलासा

 



देगलूर/प्रतिनिधी


       मुखेड तालुक्यातील लेंडी धरणाच्या बुडीत क्षेत्रात रविवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे हसनाळ, भिंगोली, भेंडेगाव, रावणगाव, मारजवाडी,भासवाडी या गावांत पूरस्थिती निर्माण झाली. शेतमाल वाहून गेला, जनावरे दगावली, घरे उद्ध्वस्त झाली आणि शेकडो कुटुंबांवर संकट कोसळले.

       अशा कठीण प्रसंगी खुशी सेवाभावी संस्था तातडीने पुढे सरसावली. संस्थेच्या वतीने रावणगावसह परिसरातील पूरग्रस्तांना शेकडो अन्नधान्य किटचे वाटप करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष एकनाथ (बबलू) टेकाळे यांनी प्रत्यक्ष गावात जाऊन पाहणी केली. पूरग्रस्तांशी संवाद साधताना त्यांनी सांगितले की, “गावातील परिस्थिती अतिशय भीषण आहे. अनेक कुटुंबांचे संसार वाहून गेले असून त्यांना तातडीने मदतीची गरज आहे. अशा वेळी प्रत्येकाने आपल्या परीने मदतीचा हात पुढे करणे आवश्यक आहे.”

      बबलू टेकाळे यांनी याआधीही अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, सणासुदीच्या काळात गरीब कुटुंबांना मदत, तसेच कोणत्याही धर्म-जातीचा भेद न करता समाजासाठी कार्य हे त्यांचे वैशिष्ट्य आहे.

        पूरग्रस्तांना दिलासा देऊन त्यांनी पुन्हा एकदा आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे. संकटाच्या काळात मदतीचा एक हातही मोठा आधार ठरतो, हे त्यांच्या कार्यातून अधोरेखित झाले.

       या वेळी संपादक गजानन टेकाळे, पत्रकार शेख असलम, धनाजी देशमुख, बालाजी चंदावाड, शेखर कोठारे, अनिल कांबळे, गंगाधर उल्लेवार, दीपक पिंटू फुगारे, आदी उपस्थित होते.

बातम्या

सोयाबीन व कापूस या पिकांचे मोठ्या नुकसान झाले आहे या दोन पिकांसाठी सरसकट विमा लागू करावा- पांडूरंग शिंदे

               नांदेड जिल्ह्यातील विशेषतः नायगाव तालुक्यातील परतीच्या पावसाने हातात आलेले पीक गेल्याने शेतकरी हावादीन झाला आहे, दिवाळीच...