२४ ऑक्टोबर २०२५

एक प्रशासकीय अधिकारी ते यशस्वी लोक प्रतिनिधी डाॅ.कुडमूलवार



शहरातील सर्व समाजाच्या समसेची जान व शहराचा विकास कसा साधावा याचा पुर्ण अभ्यास असलेले.शहराचे भूमीपूत्र माजी सेवानिवृत्त कृषी अधिक्षक तथा नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष डाॅ.विठ्ठलराव कुडमुलवार हे उच्च विद्या विभूषीत आहे.मागील 2016 चा नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीत सुजान व जागृक मतदारांनी त्यांच्या सुविधा पत्नी सौ.डाॅ.अरूणा कुडमूलवार यांना थेट नगराध्यक्ष निवडणुकीत मतदान करून निवडून दिले.डाॅ.विठ्ठल कुडमूलवार उपाध्यक्ष होते.त्यांनी त्यांचा अध्यक्ष व उपाध्यक्षीय कार्यकाळात नागरीकांचे अनेक प्रशन सोडविले,20 कोटीचे शहर विकासाचे विविध विकासात्मक कार्य केले.आगामी नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीत डाॅ.विठ्ठलराव कुडमुलवार भारतीय जनता पक्षातर्फे अध्यक्ष पदासाठी निवडणुक लढावे आणि शहराचा खंडीत विकास साधावा अशी जनतेतून पुन्हा एकदा मागणी होत आहे.

कुंडलवाडी नगरीला एक आगळा वेगळा धार्मीक,सांकृतीक,शैक्षणीक,आर्थीक,राजकीय

असा वारसा लाभलेला ईतिहास आहे.

डाॅ.कुडमूलवार यांना शहराचा पुर्ण अभ्यास आहे.

म्हणूच त्यांनी त्यांचा मागील अध्यक्षीय साडेतीन वर्षाचा कार्यकाळात निवडणूकीतील अजेंड्यात जनतेले दिलेल्या अश्वासन पुर्ण केले.

त्यात प्रथम नागरीकांचे मालमत्ता परिवर्तण म्हणजे नावपरिवर्तण मोहिम अभियांन राबविण्यात आले.त्यात लागणारे दस्तावेज मोफत नागरिकांना देण्यात आले.त्यात शहरातील 780 मालमता धारकांनी अर्ज दाखल केले होते त्यापैकी 600 नागरिकांच्या नावावर मालमत्ता नावपरिवर्तण करण्यात आले.तसेच शहरात वृक्ष लागवड विशेष योजना म्हणून हरितपट्टा विकास योजना राबविण्यात आले.या योजने अंतर्गत चार ठिकाणी हरित पट्टे निर्माण करण्यात आले.1) वैकुंठ धाम 2) शिव उद्यान 3) शेख शपाशावली दर्गा 4) के.रामलू मंगल कार्यालय आदी ठिकाणी एकंदरीत 6000 वृक्षाची लागवड करण्यात आले होते.यातील 80% वृक्ष जिवंत आहे.हे वृक्ष जिवंत ठेवण्यासाठी विशेष वृक्षांना पाणी देण्यासाठी ठिंबक योजना राबविण्यात आले होते.यामुळे ग्रिन सिटी निर्माण करण्याचे त्यांनी प्रमाणीक प्रयत्न केले.

विशेष म्हणजे जिल्हातून कुंडलवाडी नगरपरिषदेने एकमेव हरितपट्टाविकास योजना सुरू केली होती.यास शासनातर्फे विशेष योगदान सुद्धा मिळाले होते.डाॅ.कुडमूलवार यांच्या पाठपुराव्यांने नगर परिषदे 1304 घरकुल शहरात प्राप्त झाले यामुळे गरीबांचे स्वपणातील घर बांधकाम झाले.त्यातून पहिल्या टप्यात 1304 घरकुलांची मंजूरी शासनाकडून मिळाली व यासाठी लागणारा निधी 64 कोटी 36 लाखांचा पैकी शासनाकडून 5 कोटी 21 लक्ष प्राप्त झाले होते.जिल्हा सर्वात जास्त 1304 कुंडलवाडी नगरपरिषदेचा घरकुलास मान्यात शासनाकडून देण्यात आले होते.

तसेच शहरातील अंबेडकर नगर,साठेनगरीतील नागरिक गेल्या 25 वर्षांपासून शहराचा हद्दीत नसल्याने नागरीक विकासापासून वंचित होते.शहराची हद्दवाड झाली होती पण त्यांच्या मालमत्तेची नोंद नगरपरिषदेचा दपत्तरी करण्यात आली नव्हती डाॅ.कुडमूलवार यांच्या पुढाकाराने दोन्ही नगरीतील नागरीकांचे मालमत्ता पहिल्यांदा  नगर परिषद दप्तरी त्यांचाच कार्यकाळात झाले. त्यांना घरक्रमांक घरपावती नळपावती देण्यात आली.यामुळे नगरपरिषदेचा महसूलात भर पडली.तसेच दलीत वस्तीतील 65 कुटुंबांना पंतप्रधान शहरी घरकुल योजनेतून घरकुल मंजूर झाले.तसेच डाॅ.कुडमूलवार यांच्या प्रयत्नांने शहरातील नगर परिषद हद्दीतील आठ प्रभाग सत्तरा वार्डात केंद्र शासनाच्या योजने अंतर्गत स्टेट पोलवर एल.ई.डी बल्प लावण्यात आले.शहरातील 860 स्टेट पोलवर 12 हायमॅक्सवर बल्प लावण्यात आले.यापासून नगर परिषदेस स्टेट लाईट बिल दर कमी येत आहे. शहर विद्युत रोषणाईने चमकत आहे.तसेच डाॅ.कुडमूलवार यांचा पुढाकाराने नागणी रोड वरिल 13 गुंटे जमिन शमशानभुमीसाठी लोक सहभागातून लोकवर्गणीतून खरेदी करण्यात आली.अधिकृतपणे नगर परिषदेचा नावाने दप्तरी नोंद करण्यात आली. या शमशानभुमीच्या विकासासाठी 1 कोटी चा प्रस्ताव तयार करण्यात आले होते.त्यातून शमशानभुमीचा विकास करण्यात आले.तसेच गेल्या अनेक वर्षांपासून नागरीकांची मागणी होती की शहर परिसरातील नागरीकांसाठीअपत्ती व्यवस्थापसाठी अग्निशमन

वहाण नगर परिषदेत असणे आवश्यक डाॅ.कुडमूलवार यांच्या प्रयत्नातून नगर परिषदेस अग्निशमन वहाण,अग्निशमन दल,शेडची उभारणी करण्यात आली.तसेच प्रशाकिय अधिका-यांचा निवास बाधकाम करण्यात आले.यासोबत शहरात ऐतिहासिक रस्ते,नाल्या,गटारी,नगर परिषद कार्यालय वरचा मजला ईमारत बांधकाम,व्यापारी संकुल बांधकाम करण्यात आले.केंद्राचा योजनेतून विद्युत खांब 200 चा जवळपास शहरात बसविण्यात आले.उज्ज्वला केंद्रशासनाचा योजनेअंतर्गत 

मोफत गॅस कनेक्शन नागरीकांना देण्यात आले ,विद्युत कनेक्शन नागरीकांना देण्यात आले , शहरातील प्रभागात बोर मारले मोटारी बसवीले,नळ कनेक्शन जोडनी स्वच्छता अभियानांतर्गत शहरातील स्वच्छतेकडे विशेष लक्ष दिले.विशेष म्हणजे त्यांनी जनता दरबार चा माध्यमाने जनतेचे समस्या ऐकूण घेवून सोडविले.

तसेच डम्पिंग यार्ड तयार करून ओला व सुका कचर्याने खत निर्मीती करून विकण्यात आली.नागरीकांचा आरोग्यासाठी ग्रामीण रूग्णालयाची मान्यता आदीसह वैशिष्ट्यपूर्ण योजना,नागरी दलितउथान योजना,रस्ता अनुदान,विशेष रस्ता अनुदान,पंतप्रधान शहरी आवास योजना,14 व्या वित्त आयोग अशा अनेक योजनांचा पाठपुरावा करून निधी प्राप्त करून योजना राबवून शहरातील नागरीकांसाठी शहराचा विकासासाठी डाॅ.विठ्ठल कुडमूलवार यांनी आपल्या कार्यकाळात अनेक विकासात्मक कार्य केले.

त्यांच्या काळात पासुन अपंगाना अनुदान वाटप करणे सुरू झाले.

महिला सक्षमिकरणाकडे पण ते लक्ष दिले. महिला बचत गटानाना प्रोत्साहन देत त्यांचा हाताला रोजगार मिळवून दिले.

असे धार्मीक,राजकीय,सामाजिक,शैक्षणिक, विकासात्मक कार्य त्यांचे अखंडीत चालूच असतात यामुळे आगामी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यपदासाठी डाॅ.विठ्ठलराव 

कुडमूलवार यांची शहरातील नागरीकांची पहिली पसंती आहे.आगामी नगर परिषद सार्वत्रिक  निवडणुकीत डाॅ.विठ्ठलराव कुडमुलवार भारतीय जनता पक्षातर्फे अध्यक्ष पदासाठी निवडणुक लढावे आणि शहराचा खंडीत विकास साधावा अशी जनतेतून पुन्हा एकदा मागणी होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

बातम्या

सोयाबीन व कापूस या पिकांचे मोठ्या नुकसान झाले आहे या दोन पिकांसाठी सरसकट विमा लागू करावा- पांडूरंग शिंदे

               नांदेड जिल्ह्यातील विशेषतः नायगाव तालुक्यातील परतीच्या पावसाने हातात आलेले पीक गेल्याने शेतकरी हावादीन झाला आहे, दिवाळीच...