०२ जुलै २०२६

बिलोली नगर परिषद समोरील डिव्हायडरमध्ये पर्यावरणपूरक उपक्रम; ज्येष्ठ नागरिक शंकरराव अंकुशकर यांच्या हस्ते वृक्षारोपण!

 बिलोली नगर परिषद समोरील डिव्हायडरमध्ये पर्यावरणपूरक उपक्रम; प्रतिष्ठित नागरिक शंकरराव अंकुशकर यांच्या हस्ते वृक्षारोपण!


बिलोली


शहराच्या सौंदर्यीकरणात आणि पर्यावरण संवर्धनात मोलाची भर घालत, बिलोली शहरातील नगर परिषद समोरील डिव्हायडर (दुभाजक) मध्ये आज उत्साहात वृक्षारोपण करण्यात आले. हा स्तुत्य उपक्रम शहरातील  प्रतिष्ठित नागरिक श्री. शंकरराव अंकुशकर यांच्या वतीने राबविण्यात आला असून, त्यांच्या या सामाजिक जाणीवेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

पर्यावरणाचा संदेश आणि सामाजिक बांधिलकी

सध्याच्या वाढत्या प्रदूषणावर मात करण्यासाठी आणि शहराला हिरवेगार करण्यासाठी वृक्षारोपण करणे ही काळाची गरज बनली आहे. याच भावनेतून नगर परिषदेच्या समोरील मुख्य दुभाजकाची निवड करून येथे वृक्षारोपण करण्यात आले. यामुळे परिसराचे रूप पालटण्यास मोठी मदत होणार आहे.

या वृक्षारोपण कार्यक्रमाप्रसंगी  प्रतिष्ठित नागरिक शंकरराव अंकुशकर यांच्यासोबत शहरातील  नागरिक लिंगुराम एडके आणि शसुखदेव हदगले हे प्रामुख्याने उपस्थित होते. या सर्वांनी स्वतः फावडे हातात घेऊन, खड्डे खोदून अत्यंत उत्साहाने वृक्षारोपण केले आणि लावलेल्या झाडांचे पुढील काळात उत्तम संगोपन व रक्षण करण्याचा संकल्पही सोडला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

बातम्या

सोयाबीन व कापूस या पिकांचे मोठ्या नुकसान झाले आहे या दोन पिकांसाठी सरसकट विमा लागू करावा- पांडूरंग शिंदे

               नांदेड जिल्ह्यातील विशेषतः नायगाव तालुक्यातील परतीच्या पावसाने हातात आलेले पीक गेल्याने शेतकरी हावादीन झाला आहे, दिवाळीच...