बालाजी बच्चेवार यांच्या पत्रकामुळे नायगाव विधानसभा क्षेत्रात खळबळ विरोधकांबरोबर स्वपक्षातील लोकांचे नाव न घेता डागली तोफ
संघर्षमय जीवनात भारतीय जनता पार्टी वाढवली रुजवली आणि गाजवली....!
बालाजी बच्चेवार
नायगाव विधानसभा
बालाजी बच्चेवार
नायगाव विधानसभा
गेल्या तीन दशकापासून अविरत कार्य करून नायगाव उमरी धर्माबाद विधानसभा मतदारसंघात संघर्षमय जीवन संघर्षकरून भारतीय जनता पार्टी वाढवली रुजवली आणि गाजली ..!!
मी मतदार संघातील सुज्ञ नागरिकांना बुद्धिजीवी उच्चशिक्षित व्यापारी शेतकरी विद्यार्थी पत्रकारांना बहुजनवादी विचारसरणीच्या सज्जनांना नम्र निवेदन करतो कि मी नायगाव विधानसभेचा हक्कदार उमेदवार आहे मागच्या काळात भाजपाला फार चांगले दिवस नव्हते त्याकाळात भाजपाचा झेंडा खांद्यावर घेऊन कसल्याच प्रकारचे आर्थिक स्त्रोत नसताना गोरगरिबांची पोरंबाळं कार्यकर्ते एकत्र करून बहुजन समाजासाठी, शेतकऱ्यांसाठी, विद्यार्थ्यांसाठी ,व्यापाऱ्यांसाठी, शोषित, पीडित घटकाला न्याय देण्याचे कार्यकेले पक्षकार्यासाठी स्वतःला वाहून घेतले. नायगाव तालुका निर्मितीसाठी आंदोलन करून तेरा दिवसाचा कारावास भोगला त्याचबरोबर कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासकीय सभापती म्हणून काम करत असताना अनेक कठीण प्रसंगाला सामोर जात काम करावं लागलं त्या ठिकाणी पोलिसांना लाठीचार्ज सुद्धा करावा लागला ◼
पान क्रमांक (2)
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचे गब्बर नेते जबर जमीनदार कारखानदार मोठे उद्योगपती साम्राज्यवादी घराणेशाही अशा प्रस्थापितांना त्यांच्या भक्कम बुरुजांना हादरे देऊन एक निष्ठेने पक्षाचे काम करून प्रतिकूलतेत कार्यकर्त्यांच्या बळावर पक्ष वाढवला रुजवला आणि गाजवला मी बहुजनांचा चेहरा म्हणून रंजल्या गांजल्या साठी घराणेशाहीच्या विरोध दंड थोपटले शंकराव चव्हाण यांचा राजकारणात दबदबा असताना नायगाव मध्ये भारतीय जनता पार्टीला फार चांगले दिवस नव्हते जुन्या बिलोली आणि नायगाव मतदार संघावर नायगावच्या प्रस्थापित चव्हाण घराण्याची जुलमी राजवट होती दहशतीच्या वातावरणात भाजपाचे विस्तृत कार्य करण्यासाठी कार्यकर्त्यांसह उपाशीपोटी अनवाणी पाई पाई गावोगाव फिरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला प्रखर विरोध असलेल्या व भाजपा विचारधारेच्या शेकडो कार्यकर्त्यांना मुख्य प्रवाहात आणून नायगाव येथे दहशत पूर्ण वातावरणात लोकनेते गोपीनाथराव मुंडे आणि प्रमोदजी महाजन यांच्या उपस्थितीत भाजपाची पहिली शाखा स्थापन केली आणि गावोगावी पक्षाची ध्येय धोरणे पोहोचून शाखा उघडल्या हे सोपे काम नव्हते
पान क्रमांक (3)
खिशामध्ये दमडी पैसा नसतानाही उद्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी बहुजनांच्या कल्याणासाठी मी कधी कार्यकर्ते नाराज केले नाही आणि आणि मी नाउमेद झालो नाही पक्ष रुजवला
नायगावच्या राजकारणात प्रस्थापित घराण्याला सुरुंग लावला बहुजनांची मोठी फळी चळवळ तयार झाली चवताळलेल्या ,वखवताळलेल्या नेत्यांनी व त्यांच्या नात्या गोत्या ने जातीयवादाच्या ठिणग्या टाकल्या संघर्षाचा भडका उडाला बालाजी बच्चेवार आणि भारतीय जनता पार्टी संपवण्यासाठी प्राणघातक हल्ले सुरू केले बहुजनवादी विचारसरणी संपवण्याचा प्रयत्न सुरू केला माझे कार्यकर्ते पक्षासाठी आणि माझ्यासाठी पाय रोवून उभे राहिले घराणेशाहीला वंश अस्तित्वाची भीती वाटू लागली
पान क्रमांक (4)
आशा दूषित वातावरणात मी पक्षाचा तालुका अध्यक्ष झालो आणि जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली ह्या निवडणुकीत चव्हाण घराण्याचा दारुण पराभव केला चिडलेल्या चव्हाण समर्थकांनी माझ्या विजय मिरवणुकीवर तुफान दगडफेक केली अनेक कार्यकर्ते रक्तबंबाळ झाले परंतु नाउमेद झाले नाही अडले नडले आणि भिडले पण
ना मै गिरा, और न मेरी
आशाओं के महल गिरे..!
पर.. लोग मुझे गिराने मे
कही बार गीरे
अशा संघर्षमय जीवनाच्या प्रवासात मी नीखार्यावर चालून जीवघेण्या प्रवासात भारतीय जनता पार्टी वाढवली रुजवली आणि गाजवली त्यानंतर पुन्हा जिल्हा परिषद निवडणूक बरबडा सर्कल मधून काँग्रेसचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष यांचा मी दारुण पराभव केला पक्षाची ताकद वाढवली म्हणून मी आपणास बुद्धिजीवी राजकारणी पत्रकार शेतकरी विद्यार्थी व्यापारी जनताजनार्दन मायबाप यांना नम्र निवेदन करतो कि विधानसभेचे उमेदवारी मागण्याचा माझा हक्क आहे आणि तो मला मिळाला पाहिजे आपण तो मिळवून दिला पाहिजे आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी
पान क्रमांक (5)
मित्रांनो सजन हो माझा लढा बहुजनांसाठी शेतकऱ्यांसाठी आहे आपली गोरगरिबांची मुलं का राजकारणाचे सरपंच सभापती जिल्हा परिषद सदस्य किंवा आमदार होण्याचे स्वप्न उराशी बाळगूनच नये का? लोकशाहीमध्ये एकाच घराण्यांमध्ये कोतवाला पासून आमदारा पर्यंत सर्वच पद आपल्याच परिवारामध्ये राहावे हे आपणास योग्य वाटते का? नात्यागोत्याचे राजकारण करून विकास ठप्प केला याच्याविरोधात मी आवाज उठवला मी पूर्णवेळ कार्यकर्ता आहे कोणी मुंबई पुण्याला कोणी नांदेडला राहून उमेदवारी मागत आहेत पण मी आपल्यातच नायगावला राहणारा आपला माणूस आहे आपल्यासाठी पंचायत समिती जिल्हा परिषद तहसील कार्यालय पोलिस ठाणे किंवा बँक कुठेही काम असो मी सदैव तत्पर आहे
पान क्रमांक (6)
मी आपणास नम्रपणे सांगू इच्छितो काही धंदेवाईक राजकारणी कसल्याच प्रकारचे पक्षाला योगदान नसताना केवळ सुगी ला येऊन खळ लुटून नेण्यासाठी पक्षाची उमेदवारी मागत आहेत हे लोक उद्या निवडून आल्यावर जनतेच्या सेवेसाठी उपलब्ध होणार नाहीत संधीसाधू लोक निष्ठावंतांना डावलून आयाराम गयाराम आणि पैसे वाले गब्बर नशीब अजमावून पाहत आहेत ह्याचा विचार आपण करा निवडणुका आल्या की सुगी ला येऊन खळं लुटण्याची वृत्ती जोर खात आहे असो
मी जमीनदार नाही मी वतनदार नाही गेल्या गेल्या 28 वर्षाच्या सार्वजनिक जीवनात भ्रष्टाचार केला नाही माझ्यावर अक्षेप नाही मी निष्कलंकीत निर्व्यसनी शाखाहारी माळकरी वारकरी परंपरेत जीवन जगलो भाजपा वाढवली रुजवली आणि गाजवली
लोकसेवा हीच माझी भक्ती आणि पूजा
देवेंद्र आणि नरेंद्र हेच माझे दैवत
मी पाईक जनतेचा
मी चौकीदार भारतीय जनता पार्टीचा
जय महाराष्ट्र जय श्रीराम
अगदीच बरोबर पण पार्टीने विचार करायला हवा आपला
उत्तर द्याहटवाएकदम बरोबर, अगदी सत्यस्थिती आपण मांडली. जनता आपणास वार्यावर सोडणार नाही,
उत्तर द्याहटवाएकदम बरोबर, अगदी सत्यस्थिती आपण मांडली. जनता आपणास वार्यावर सोडणार नाही,
उत्तर द्याहटवाआम्ही आपल्या सोबत आहोत. आपल्याला न्याय मिळेलच
उत्तर द्याहटवा👍👌
उत्तर द्याहटवा