१९ सप्टेंबर २०२०

कै.अॅड. अनिल गोधमगांवकर यांच्या पुण्यस्मरणार्थ गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

 

अर्जापूर:  १७ सप्टेंबर रोजी पानसरे महाविद्यालय अर्जापूर येथे कै.अॅड अनिल गोधमगांवकर यांच्या पुण्यस्मरणार्थ दहावी बारावी उत्तीर्ण तालुकास्तरीय गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.याप्रसंगी हुतात्मा गोविंदराव पानसरे शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री मनोहरराव देशपांडे प्रमुख पाहुणे व कार्यक्रमाध्यक्ष म्हणून उपस्थित होते. त्यांच्यासोबत संस्था व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मोहनराव दमकोंडावार उपस्थित होते .यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना रोख एकवीसशे रुपये व सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अशोक श्रीरामे व सर्व प्राध्यापक , शिक्षकेतर कर्मचारी व गुणवंत विद्यार्थी उपस्थित होते.यावेळी कै. ॲड गणपतराव गोधमगांवकर यांच्या स्मरणार्थ पानसरे महाविद्यालयाची कु.प्रतीक्षा मंचल वाड हिने वाणिज्य शाखेतून ८९.७ टक्के गुण प्राप्त केले ती तालुक्यातून बारावीत प्रथम आल्याबद्दल सन्मानित करण्यात आले. तसेच कै. प्रमिलाताई गोधमगांवकर यांच्या स्मरणार्थ तालुक्यातून प्रथम आलेली लिटिल फ्लाॅवर कॉन्वेंट स्कूल बिलोलीची कु.दुर्गेश्वरी ढगे हीस ९७ टक्के गुण प्राप्त मिळविल्याबद्दल सन्मानित करण्यात आले.तर इयत्ता दहावीतून पहिला आलेला सैनिकी विद्यालय सगरोळीचा शिवकुमार शिंदे यास ९६.६० टक्के गुण प्राप्त केल्याबद्दल त्याला कै.डॉ.अरुण गोधमगांवकर यांच्या स्मरणार्थ सन्मानित केले तर कै. ॲड अनिल गोधम गांवकर यांच्या स्मरणार्थ पानसरे महाविद्यालयाचे  विद्यार्थी शेख समीर दस्तगीर बारावी विज्ञान शाखेतून ८७.५३ टक्के  तर स्वप्निल घाटे याने बारावी कला शाखेतून ८१.३७ टक्के गुण प्राप्त केल्याबद्दल सन्मानित करण्यात आले. हा कार्यक्रम ध्वजारोहण व विद्यापीठ गीतानंतर घेण्यात आला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. गोपाळ चौधरी यांनी केले या प्रसंगी सर्वांनी मास्क व सोशल डिस्टंसिंग चा वापर केला होता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

बातम्या

सोयाबीन व कापूस या पिकांचे मोठ्या नुकसान झाले आहे या दोन पिकांसाठी सरसकट विमा लागू करावा- पांडूरंग शिंदे

               नांदेड जिल्ह्यातील विशेषतः नायगाव तालुक्यातील परतीच्या पावसाने हातात आलेले पीक गेल्याने शेतकरी हावादीन झाला आहे, दिवाळीच...