कुंडलवाडी (मोहम्मदअफजल )
कुंडलवाडी येथील विविध शासकीय निमशासकीय कार्यालयात ध्वजारोहण करीत 72 वा मराठवाडा मुक्तीदिन शोषल डिस्टन्स नियमाचे पालन करीत साजरा करण्यात आले.
नगर परिषद कार्यालयात मुख्य प्रशासकीय ध्वजारोहण नगराध्यक्षा डाॅ.विठ्ठल कुडमूलवार,अधिक्षक विश्वास लटपटे,लेखपाल,लिपिक गंगाधर पत्की आणि
सर्व संन्मानीय नगरसेवक यांच्या हस्ते.स्वामी रामानंद तिर्थ यांच्या प्रतीमेचे पुजन करून नगराध्यक्षा डाॅ.विठ्ठल कुडमूलवार यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले.यावेळी
न.प.कर्मचारी उपस्थित होते.
प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी डाॅ.बालाजी सातमवाड यांच्या हस्ते हस्ते.स्वामी रामानंद तिर्थ यांचा प्रतीमेचे पुजन करून ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी सर्व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.
पोलीस ठाण्यात सपोनी.सुरेश मान्टे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले यावेळी सपोउनी.विशाल सुर्यवंशी व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
सेवा सहकारी सोसायटी येथे प्रभारी चेअरमन सयाराम नरावाड यांच्या हस्ते स्वामी रामानंद तिर्थ रांच्या प्रतिमेचे पुजन करून ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी
लेखपाल मिनाक्षी लाडे व कर्मचारी उपस्थित होते.
कृषी उत्पन्न बाजार समिती येथे सचिव लक्ष्मण सोमशट्टे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले यावेळी निरिक्षक लक्ष्मीकांत येपूरवार व कर्मचारी उपस्थित होते.
जिल्हा परिषद हायस्कूल येथे मुख्याध्यापक डी.पी.शेट्टीवार,शाळा व्यवस्थापण समिती अध्यक्ष मोहम्मद अफजल,जेष्ठ शिक्षक बी.एच.रामोड हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी,भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डाॅ.बाबासाहेब आंबेडकर,स्वामी रामानंद तिर्थ यांच्या प्रतीमेचे पुजन करून मुख्याध्यापक डी.पी.शेट्टीवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी सय्यद उपाध्यक्ष फारूख पट्टेदार शिक्षक एस.डी कमठाणे सर,जी.के बोईनवाड सर,जियाओदीन ईरफान सर,जुबेर सर,अनवरी मॅडम,दिलशाद मॅडम,राजू बोधनकर,सवीता बोधनकर आदी उपस्थित होते.
केंद्रीय जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळेचे मुख्याध्यापक देवीदास निरडवार शाळा.व्यवस्थापण समिती अध्यक्ष हणमंलू ईरलावार यांच्या हस्ते स्वामी रामानंद तिर्थ,राष्ट्रपिता महात्मा गांधी,महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतीमेचे पुजन करून मुख्याध्यापक देवीदास निरडवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा