नायगांव बा,
देशात व राज्यातही भारतीय जनता पक्ष प्रथम क्रमांकाचा पक्ष असून शिस्तीचा पक्ष म्हणून ओळखला जातो. येथे गटा-तटाला थारा नसून निष्ठेने काम करणारेंनाच स्थान मिळते त्यामूळे आपण आपल्या पक्षाच्या सत्तेच्या माध्यमातून जनसेवेत कायम राहावे सोबतच, पक्षाची ध्येयधोरणे जनतेपर्यंत पोहचवावित असे आवाहन भाजपा युवा नेते बालाजी बच्चेवार यांनी केले.
नायगांव विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी नायगाव तालुका कार्यकारिणीच्या पक्ष सदस्यता नोंदणी अभियाना अंतर्गत आज दि. 4 जुलै रोजी नायगांव बा.येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते.
या बैठकीस भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष आ. राम पा.रातोळीकर, नायगाव विधानसभा मतदारसंघाचे युवानेते बालाजी बच्चेवार, गोदावरी मनार चे चेअरमन डी.बी.पाटील होटाळकर, भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य श्रावण पाटील भिलवडे, जिल्हा सरचिटणीस राजू गंदीगुडे, जिल्हा परिषद सदस्य माणिकराव लोहगावे, जिल्हा चिटणीस अवकाश पाटील धुपेकर, तालुकाध्यक्ष धनराज शिरोळे, सरचिटणीस सुरेश कदम, विधानसभा विस्तारक सुरेशराव मोरे, दिलीपराव धर्माधिकारी, पं.स.सदस्या प्रतिनिधी परमेश्वर पाटील, नामदेव कांबळे,पंडितराव पाटील नरंगलकर, माधव माचनवाड, कुंटूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्र. सभापती शिवाजी पाटील जाधव, हनुमंत पाटील कदम,
गुलाब पाटील कदम सोमठाणकर, गजू पाटील कदम, शंकर पाटील कल्याण, आनंद बावणे, वैजनाथ ढगे, प्रदीप पाटील, नागेश पाटील कहाळेकर, शेख सायबन, विठ्ठल पा. तिजारे, शहराध्यक्ष गजानन पा. चव्हाण, अविनाश पाटील चव्हाण, रावसाहेब पाटील बेलकर, शिवाजी ढगे, जयवंतराव पवळे, गणेश पाटील ढग, योगेश पाटील कोपरेकर, रवी पाटील कोपरेकर, प्रकाश केरुरे, महेश देशपांडे, बाळू मुदखेडे, राजेश अनेराये,राजेश गज्जलवार,माधव पाटील जाधव,पंडितराव हंबर्डे, संजय नेरलेवाड,गोविंद कदम,संजय नंदनवने, शिवाजी बेळकोणीकर, रणजीत पाटील रुईकर, रामदास कांबळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी बोलतांना बालाजी बच्चेवार यांनी लोकसभा निवडणुकीत काम केलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानले व ज्या-ज्या बूथमध्ये आघाडी मिळाली त्या सर्व कार्यकर्त्यांचे ही विशेष आभार मानले, येणाऱ्या काळामध्ये पक्षाची सदस्यता नोंदणी अभियान मोठ्या प्रमाणात राबवून गावात असलेल्या मतदाराच्या संख्येच्या तुलनेत 50 टक्क्यांपेक्षा जास्तीचे मतदार भारतीय जनता पार्टीचे सदस्य झाले पाहिजेत ह्या दृष्टीने कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. त्याचबरोबर, शेतकऱ्यांना पिक कर्ज वाटपाच्या संदर्भात आ. राम पा.रातोळीकर यांनी सर्व बँकेच्या मॅनेजर लोकांशी व तहसीलदार यांच्या उपस्थितीमध्ये बैठक घेऊन आढावा घ्यावा व किती लोकांना पीक कर्ज वाटप केले याची माहिती घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली.
तसेच,पक्ष कार्यकर्त्यांनी आगामी विधानसभा निवडणूकीत नायगांव मतदारसंघात उमेदवारीसंदर्भात अनेक जण इच्छुक असले तरी कार्यकर्त्यांनी एकमेकांचा नेता खराब कसा आहे हे सांगण्यापेक्षा आपल्या पक्षाने केंद्र व राज्यात सत्तेच्या माध्यमातून जनसेवेसाठी करित असलेले काम व विविध योजनांच्या प्रचार व प्रसारासह पक्षाची ध्येयधोरणे पहिल्यांदा सांगावीत व नंतर आपल्या स्थानिक नेतृत्वाची जनतेप्रतिची कार्यपद्धती व तत्परताही सांगावी व आपले नेतृत्व सक्षम आहे हे सांगण्याचा प्रयत्न करावा. कार्यकर्त्यांनी परस्परांमध्ये विश्वासाचं वातावरण निर्माण करावं.
आ. राम पा.रातोळीकर यांनी आपल्या मनोगतामध्ये भारतीय जनता पार्टी नायगाव विधानसभा क्षेत्रातील सर्व कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात मेहनत करून पक्षाने दिलेल्या लोकसभेच्या उमेदवाराला 21,000 मताधिक्य दिल्याने सर्व कार्यकर्त्यांचे विशेष आभार मानले व त्यांचा सत्कारही केला. डीपीडीसीच्या आगामी बैठकीमध्ये शेतकऱ्यांच्या पीक विम्यासंदर्भात व पिक कर्ज वाटपाच्या संदर्भात बॅंकेच्या अधिकाऱ्यांना पाचारण करून पूर्ण नायगाव तालुक्यातील व मतदार संघातील पिक कर्ज वाटपाचा आढावा घेण्यात येईल व लवकरच बैठक आणि लावण्यात येतील असे आश्वासन दिलं.नायगाव विधानसभा मतदारसंघ हा माझा स्वतःचा मतदारसंघ असल्यामुळे आपले विशेष लक्ष या मतदारसंघाकडे राहणार आहे,राहिले आहे व यापुढेही राहील असेही त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले.
श्रावण पा. भिलवंडे, धनराज शिरोळे, माणिकराव लोहगावे, शंकर पाटील आदींनीही याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले.
पक्षाचे माजी तालुकाध्यक्ष बाळासाहेब ताटे-पाटील नरसीकर यांना या बैठकीत श्रद्धांजली वाहण्यात आली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा