नायगाव येथील शेतकरी मेळाव्याची परिसरात उत्सूकता
महाराष्ट्र राज्याचे माजी कृषी राज्यमंत्री तथा शेतकरी नेते आ.सदाभाऊ खोत यांच्या प्रमुख उपस्थिती रयत क्रांती संघटना आयोजित भव्य शेतकरी मेळावा दि.१३/०२/२०२० गुरुवारी कृषी उत्पन्न बाजार येथील मैदानात होणार आहे.
सदाभाऊ खोत हे शेतकरी संघटनेतून व सामान्य कुटुंबातुन पुढे आलेले नेतृत्व आहे. स्व.शरद जोशी यांच्या तालमीत तयार झालेले त्याचे लाडके शिष्य होते, चळवळीच्या राज्यातील अनेक सभेत सदाभाऊ खोत आक्रमक भाषण करत असत म्हणून त्याची ओळख महाराष्ट्राची मुलुख मैदानी तोफ झाली आहे.
सदाभाऊ खोत आपल्या भाषणाच्या शैलीने अनेक सभा गाजवले आहेत, पश्चिम महाराष्ट्रात प्रस्थापित नेते, कारखान्याचे मालकांना घाम फोडवले ,शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न सोडविण्यासाठी त्याचा पुढाकार होता.
सदाभाऊ खोत हे आपली संघटना बांधणी साठी संपूर्ण राज्यात दौऱ्यावर निघाले आहेत,त्याच एक भाग नायगाव येथे शेतकरी मेळावा होत आहे,या मेळाव्यात त्याची तोफ कोणावर डागणार यांची उत्सूकता नायगाव परिसरात निर्माण झाली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा