बेटमोगरा येथे त्यागमूर्ती रमाबाई आंबेडकर यांचा १२२ वा जन्मोत्सव उत्साहात साजरा.
मुखेड तालुक्यातील बेटमोगरा येथे मातोश्री रमाबाई भिमराव आंबेडकर सामाजिक सेवाभावी संस्थेच्या वतीने दि.७ फेब्रुवारी २०२० रोजी रमाई जन्मोत्सव व पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या पहिल्या सत्राची सुरुवात सकाळी ठिक ९:०० वा पंचशील धम्म ध्वजारोहण आयु.लालिताबई सोनकांबळे व दत्तात्रय पाटील यांच्या हस्ते करण्यात आले तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर व रमाबाई आंबेडकर यांच्या पूर्णकृती प्रतिमांना मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून सामूहिक बुद्ध वंदना घेण्यात आली."
मातोश्री रमाबाई भिमराव आंबेडकर सामाजिक सेवाभावी संस्था गेली ६ वर्षांपासून सामाजिक बांधिलकी जोपासत मानव कल्याणासाठी सामाजिक क्षेत्रात, कधी वयोवृद्ध व्यक्तीसाठी मायेचा हात देत मोफत नेत्र तपासणी, विविध प्रकारची आरोग्य तपासणी, रक्तदान शिबीर, गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा,व्याख्यानमाला व समाज प्रबोधनपर कार्यक्रम अशा विविध प्रकारचे सामाजिक कार्य या रमाई फाऊंडेशन च्या माध्यमातून तालुक्यात उल्लेखनीय कामगिरी बजावत आहे.
या मातोश्री रमाबाई भिमराव आंबेडकर सामाजिक सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष प्रकाश दत्ता सोनकांबळे व सचिव
भारत सोनकांबळे सह भगवान सोनकांबळे,आयु.
सगरबाई दत्ता सोनकांबळे,आयु.महादाबाई कांबळे, चंद्रकांत कांबळे, जयश्री ज्ञानेश्वर सोनकांबळे यांच्या माध्यमातून दरवर्षी ७ फेब्रुवारी रोजी महामाता,त्यागमुर्ती, विश्वरत्न,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची सावली म्हणजेच माता रमाबाई आंबेडकर यांची जयंती साजरी होते याहीवर्षी माता रमाबाईंच्या १२२ व्या जन्मोत्सवा निमित्त दि.७ फेब्रुवारी २०२० रोज शुक्रवारी संस्थेचे सचिव तथा पत्रकार भारत सोनकांबळे यांच्या संयोजनातून बेटमोगरा येथील धम्मशील बुद्धविहार येथे रमाई जन्मोत्सव व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या
व्यक्तींचा पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये प्रामुख्याने पुरस्काराचे मानकरी मुखेड तालुक्यात वैद्यकिय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे,मराठवाडा भूषण तथा मुखेड भूषण सुप्रसिद्ध सर्पदंश तज्ञ डॉ. दिलीपराव पुंडे व मुखेड तालुक्यासह सबंध नांदेड जिल्ह्यात सामाजिक क्षेत्रात व आंबेडकरी चळवळीत उल्लेखनीय कामगिरी बजावणारे मा. दशरथराव लोहबंदे,तसेच मुखेड तालुक्यात आंबेडकरी चळवळीला गीत गायनाच्या रूपात जीवंत ठेवत उल्लेखनीय कार्य करणारे गायक तेजेराव भद्रे सह तालुक्यात पशू वैद्यकिय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे व सामाजिक क्षेत्रात नेहमीच अग्रेसर राहणारे डॉ.राहुल कांबळे इत्यादींना यावर्षीचा रमाई फाऊंडेशन बेटमोगरा च्या वतीने संस्थेचे सचिव भारत सोनकांबळे यांच्या हस्ते कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात सन्मान चिन्ह व रमाई पुरस्कार प्रदान करण्यात आला.
बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघर्षमय जीवनातील साऊली,देशातील बहुजनांची माऊली,म्हणजेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची अर्धांगिनी माता रमाबाई भीमराव आंबेडकर.
रमाई म्हणजे भारतभूमीच्या उदारातील कोहिनूर हिरा घडवणारी कस्तुरी आपल्या आयुष्यभराच्या त्यागाने अन् श्रमाने बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना घडवण्याला रमाबाई चे अतिशय महत्वाचे योगदान लाभले आहे.
"प्रत्येक यशस्वी पुरुषामागे स्त्रीची महत्वाची भूमिका" या उक्तीप्रमाणे यावर्षीचा प्रदान करण्यात येणारा पुरस्कार हा सपत्नीक देण्यात आला.
कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्राचे अध्यक्ष गावातील प्रतिष्ठित व्यक्ती मा.चिनू पाटील होते तर उद्घाटन डॉ.वीरभद्र हिमगिरे व बळवंतराव पाटील यांच्या हस्ते सायंकाळी ठिक ६:०० वा.महापुरुषांच्या प्रतिमांना दीप,धूप व पुष्पहार अर्पण करून करण्यात आले.
यावेळी मराठवाडा भूषण डॉ.दिलीप पुंडे यांनी उपस्थितांना सखोल मार्गदर्शन करीत माता रमाबाईंच्या त्यागामुळेच डॉ बाबासाहेब आंबेडकर घडू शकले,डॉ.बाबासाहेब आंबेडकर घडले म्हणून भारतीय संविधान निर्माण झाले,आणि संविधान निर्माण झाल्यामुळेच डॉ.पुंडे निर्माण झाले व हजारो सर्पदंश रुग्णांना जीवदान मिळाले, संविधान म्हणजे दुसरे तिसरे काही नसून बहुजनांच्या कल्याणचा जाहीरनामा आहे असे प्रतिपादन यावेळी बोलताना केले.
आजच्या रमाई पुरस्काराचे मानकरी डॉ.राहुल कांबळे व तेजेराव भद्रे सह डॉ. वीरभद्र हिमगिरे,बळवंतराव पाटील यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.
रमाई फाऊंडेशनच्या वतीने संस्थेचे सचिव तथा पत्रकार भारत सोनकांबळे यांच्यावतीने भोजनदान करण्यात आले.
कार्यक्रमाचे तिसरे सत्र रात्री ९:०० वा.मुखेड पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक मा. भाऊसाहेब मगरे यांच्या हस्ते उद्घाटना नंतर महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक रविराज भद्रे आणि संच यांचा बुद्ध भीम गीतांचा कार्यक्रम पार पडला.
या कार्यक्रमाला प्रमुख
उपस्थितीमध्ये रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष अनिल सिरसे, सिद्धार्थ कांबळे बेळीकर,मा.चिनू पाटील, ग्रा.पं.सदस्या
ललिताबाई मालू सोनकांबळे, दीपक सोनकांबळे,दत्तात्रय पाटील,खुशालराव पाटील,धनराज पाटील,भानुदास पाटील,पत्रकार दत्तात्रय कांबळे, आयु.गंगाधर सोंडारे,पत्रकार भास्कर भेदेकर,धम्मनंद भेदेकर, महेताबभाई शेख,अजीम शेख, दै.साहित्य सम्राट चे संदीप कांबळे,संपादक नामदेव
यलकटवार,मुस्तफा पिंजारी, निवृत्ती पोटफोडे,प्रल्हाद सोनकांबळे,दिलीप सोनकांबळे,शंकर सोनकांबळे, राहुल सोनकांबळे,हर्षदीप सोनकांबळे, आनंदा सोनकांबळे, गोविंद सोनकांबळे,सागरबाई सोनकांबळे,शांताबाई सोनकांबळे,ज्योतीबाई सोनकांबळे,शीलाबाई सोनकांबळे,मंगलबाई सोनकांबळे, अनिता सोनकांबळे, अंजनाबाई सोनकांबळे, निकिता सोनकांबळे,जयश्री सोनकांबळे, शेवंताबाई कांबळे,कु.शितल कांबळे,मालू सोनकांबळे, कु.नव्या सोनकांबळे,संविधान सोनकांबळे, कु.करुणा सोनकांबळे,धम्मशिला बकरे, यशवंत सोनकांबळे, दयानंद सोनकांबळे,विनोद बकरे,नागेश सोनकांबळे,संघर्ष सोनकांबळे, इत्यादींसह हजारोंच्या संख्येने महिला,पुरुष व युवक उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे संयोजन व सुत्रसंचलन संस्थेचे सचिव भारत सोनकांबळे यांनी केले तर आभार प्रदर्शन व्यंकट सोनकांबळे यांनी केले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा