सोयाबीन व कापूस या पिकांचे मोठ्या नुकसान झाले आहे या दोन पिकांसाठी सरसकट विमा लागू करावा- पांडूरंग शिंदे
नांदेड जिल्ह्यातील विशेषतः नायगाव तालुक्यातील परतीच्या पावसाने हातात आलेले पीक गेल्याने शेतकरी हावादीन झाला आहे, दिवाळीच्या सणाच्या दिवसांत गावगड्यात आज शोक कळा पसरली आहे, अश्या परिस्थिती विमा कंपनीने एक फतवा काढला की ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले त्याचा फॉम् भरून त्यासोबत सातबारा तसेच विमा भरलेली पावती जोडून द्यावी,हे सर्व करण्यासाठी एका शेतकऱ्यांला कमीत कमी ४०० ते ५०० ₹ रुपये खर्च येतो. आजच्या परिस्थिती शेतकऱ्यांना हा खर्च परवडणारा नाही.विमा कंपनी कडे सर्व माहिती असताना ही माहिती मागवणे म्हणजे विमा कंपनी डोके ठिकान्यावर आहे अशा उद्दगित होऊन रयत क्रांती संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे मांजरमकर यांनी प्रश्न केला आहे.
पांडुरंग शिंदे म्हणाले की, पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले हे विमा कंपनी व प्रशासनाला गांभीर्य राहिले नसून फक्त शेतकऱ्यांना कागदपत्रात अडकून वेळ घालवण्याचा हा प्रकार आहे.
सोयाबीन व कापूस या पिकांचे मोठ्या नुकसान झाले आहे या दोन पिकांसाठी सरसकट विमा लागू करावा .
शेतीतील जमिनीत अजूनही पाणी साचून आहे त्यामुळे रबी हंगाम सुध्दा हातचा जाणार आहे. खरीब व रबी हंगामात मिळून नुकसान भरपाई हेक्टरी पनास हजार रुपये( ५०,०००) द्यावे.
प्रशासन व नवीन येणारे सरकार योग्य ते कार्यवाही अन्यथा येणाऱ्या काळात शेतकऱ्यांचा असंतोष उफाळून बाहेर येईल.याला जबाबदार शासन राहील असा इशारा शिंदे यांनी दिला आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा