२७ ऑक्टोबर २०१९

परतीच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत द्यावी- बालाजी बच्चेवार


 
 नांदेड जिल्ह्यातील नायगाव विधानसभा क्षेत्रात नायगाव, धर्माबाद ,उमरी ह्या तिन्ही तालुक्यातील क्षेत्रात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे ,शेतीचे ,उभ्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. नदी-नाल्यांना व ओढ्यांना पाणी येऊन नदी नाल्या काठच्या लोकांची शेती पूर्णपणे खरडून वाहून गेली आहे त्याच बरोबर कापणीला आलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसानही झाले आहे .
सतत पावसाच्या पाण्याने सोयाबीन, कापूस हायब्रीड ज्वारी फळबाग या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन पिके उभी असतानाच त्या पिकांच्या दाण्यांना मुळे फुटले आहेत.
त्यामुळे नायगाव  धर्माबाद उमरी  तिन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान  झाले आहे तरी प्रशासनाने तत्काळ संबंधित शेतीचे पंचनामे करून सरसकट आर्थिक नुकसान भरपाई मिळवून देण्या संदर्भात पिक विमा कंपनीला आदेशित करावे व शासनालाही झालेल्या नुकसानीचा अहवाल पाठवून देऊन शासनस्तरावरून नही मदत करण्याच्या अहवाल शासनाकडे पाठवावा अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य बालाजी बच्चेवार यांच्या कडून होत आहे. उद्या दि 29 /10/2019 रोजी रितसर निवेदन तहसीलदार नायगाव यांना देण्यात येणार आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

बातम्या

सोयाबीन व कापूस या पिकांचे मोठ्या नुकसान झाले आहे या दोन पिकांसाठी सरसकट विमा लागू करावा- पांडूरंग शिंदे

               नांदेड जिल्ह्यातील विशेषतः नायगाव तालुक्यातील परतीच्या पावसाने हातात आलेले पीक गेल्याने शेतकरी हावादीन झाला आहे, दिवाळीच...