०४ ऑगस्ट २०२०

भोकर कोविड सेंटर ला नोडल अधिकारी डॉ रत्नपारखी यांची भेट



भोकर- कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव व कोविड सेंटर येथे देण्यात येणाऱ्या सोय सुविधा बद्दल जिल्हाधिकारी डॉ विपीन यांनी जिल्हा मध्ये तालुका निहाय नोडल अधिकारी समन्वयक यांची नियुक्ती केली. आज दि.४ ऑगस्ट रोजी भोकर येथील कोविड सेंटर ला डॉ एम.आर.रत्नपारखी नोडल अधिकारी व उपायुक्त जिल्हा पशुसंवर्धन यांनी भेट दिली. येथील चार रूग्ण यांना भेट दिली व येथील सोयी सुविधा बाबत विचारणा केली व देण्यात येणाऱ्या सुविधे बद्दल समाधान व्यक्त केले. 
यावेळी भरत सुर्यवंशी तहसीलदार, डॉ अशोक मुंडे वैद्यकीय अधिक्षक, डॉ राहूल वाघमारे तालूका आरोग्य अधिकारी, सत्यजीत टिप्रेसवार, पांडुरंग तम्मलवाड हे उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

बातम्या

सोयाबीन व कापूस या पिकांचे मोठ्या नुकसान झाले आहे या दोन पिकांसाठी सरसकट विमा लागू करावा- पांडूरंग शिंदे

               नांदेड जिल्ह्यातील विशेषतः नायगाव तालुक्यातील परतीच्या पावसाने हातात आलेले पीक गेल्याने शेतकरी हावादीन झाला आहे, दिवाळीच...