कुंडलवाडी प्रतिनिधी(मोहम्मद अफजल)येथील कै.गंगाबाई पोतन्ना सब्बनवार मुलींचे हायस्कूलच्या मराठी विषयाच्या अध्यापिका सौ.कुसूम परमेश्वर अप्पा कवठाळे या २८ वर्षाच्या सेवेनंतर ३१ जुलै रोजी सेवानिवृत्त झाल्या आहेत.एक उपक्रमशील,विद्यार्थीनी प्रिय व ज्ञाननिष्ठ शिक्षिका म्हणून त्यांचा लौकिक होता.
त्यांच्या सेवानिवृत्त बद्दल व त्याच्या भावी जीवनास संस्थेचे अध्यक्ष तथा न.प.माजी.उपाध्यक्ष गंगाधर सब्बनवार,सचिव डाॅ.प्रशांत सब्बनवार,मुख्याध्यापक साईनाथ बाबळीकर,उच्च माध्यमिकचे प्रा.शंकर पवार,प्रा.श्रीनिवास गोकिंरलावार,माध्यमिक विद्यालयातील सहशिक्षक लक्ष्मण होरके,रवीकांत शिंदे,माधव शिवपनोर,कल्याण गायकवाड.दत्तात्रय अर्धापूरे,आकाश अर्जूने,शाम पवार,प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक नागनाथ चटलूरे,योगेश कंदकूर्ते,व्यंकट गट्टूवार,सारीका सब्बनवार,विद्या वाघमारे,रमेश जाधव,सुरेखा चोंडीकर,राजेश जायेवार,गंगाधर बिलोलीकर.अमोल सिरेवार आदीनी शुभेच्छा दिल्या.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा