कुंडलवाडी प्रतिनिधी (मोहम्मद अफजल)
बिलोली तालूक्यातील कोल्हेबोरगाव येथील जय किसान माध्यमिक शाळेचा दहावीचा निकाल 95 टक्के लागला असून मागील अनेक वर्षापासून असलेली उज्वल निकालाची परंपरा शाळेने कायम राखली आहे.याबद्दल विद्यालयातील विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन होत आहे.
विद्यालयातून अस्मित रामपूरे यांनी 87% गुण घेवून सर्व प्रथम येण्याचा बहुमान मिळवीला.तर तुकाराम मेहत्री 86% गुण घेवून विद्यालयातून सर्व द्वितीय येण्याचा बहुमान प्राप्त केला.
विद्यालयातून दहावी बोर्ड परीक्षेस एकूण 61 विद्यार्थी बसले होते.यापैकी 5 विद्यार्थी विशेष प्रावीन्यात आली असून 14 विद्यार्थी प्रथम श्रेणी मध्ये तर 22 विद्यार्थी द्वितीय श्रेणी मध्ये व अन्य विद्यार्थी यशस्वी झाले आहेत.सदरील शाळेने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी उच्च निकालाची परंपरा कायम ठेवली.ग्रामीण भागात कोणत्याही कोचिंग कलासेस नसतानाही अत्यंत चांगले गुण विद्यार्थ्यांनी घेतल्याबद्दल संस्थापक सचिव उमाकांतराव गोपछडे,अध्यक्ष केशवराव नावाडे व मुख्याध्यापक हवगीराव गोपछडे यांनी मुलांचे कौतुक केले आहे.यशस्वी मुलांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे कोल्हेबोरगाव,पाचपिंपळी, तळणी व गागलेगाव च्या पालकांनी अभिनंदन केले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा