१६ नोव्हेंबर २०२५

भाजप पक्षाच्या हितासाठी व शहराच्या विकासासाठी माजी.नगराध्यक्ष डाॅ.कुडमूलवार व बेजगमवार एकत्र



कुंडलवाडी प्रतिनिधी

कुंडलवाडी नगरपरिषद निवडणुकीची रणधुमाळी सध्या जोरात सुरू असून या पार्श्वभूमीवर कुंडलवाडी नगरपालिका भाजपचे नगराध्यक्ष पदाबाबत अद्याप घोषणा झाली नाही. या पार्श्वभूमीवर कुंडलवाडी नगरपालिकेचे भाजपचे माजी नगराध्यक्ष विठ्ठलराव कुडमुलवार,

माजी.नगराध्यक्ष सुनील बेजगमवार हे आज दि.१६ नोव्हेंबर रोजी एकत्र आले आहेत.भारतीय जनता पक्ष आणि शहराच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच शहरातील विकास प्रेमी नागरीकांचा ईच्छेमुळे आम्ही दोघे एकत्र आले असल्याची माहिती माजी नगराध्यक्ष डॉ.विठ्ठल कुडमुलवार आणि माजी नगराध्यक्ष सुनील बेजगमवार यांनी दिली आहे.कुंडलवाडी नगरपरिषद निवडणुकीची सध्या नामनिर्देशन पत्र दाखल करावयाची प्रक्रिया सुरू असून नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचे अंतिम तारीख उद्या दि.१७ नोव्हेंबर रोजी आहे या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाकडून अद्याप नगराध्यक्षपदाचा चेहरा कोण? याबाबत पक्षश्रेष्ठींकडून नाव जाहीर करण्यात आले नाही. या पार्श्वभूमीवर कुंडलवाडी शहरात अनेक राजकीय समीकरण घडत असून यातच १६ नोव्हेंबर रोजी भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ माजी नगरसेवक पंढरीसेठ दाचावार यांच्या निवासस्थानी भाजपचे माजी नगराध्यक्ष डाॅ.विठ्ठलराव कुडमुलवार आणि सुनील बेजगमवार हे दोघे नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकत्र आले. यावेळी अनेक बाबींवर एक मत होऊन विविध विषयांवर चर्चा झाली. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी व आगामी काळातील निवडणुकीत पक्ष हित राखून तसेच शहराच्या जनमताचा कौल चा आदर करून दोघेही एकत्र आल्याची प्रतिक्रिया माजी उपनगराध्यक्ष डॉ विठ्ठल कुडमुलवार व माजी नगराध्यक्ष सुनील बेजगमवार यांनी दिली आहे. भाजपमधील अंतर्गत गट संपुष्टात होऊन एकत्र आल्याने आगामी काळातील नगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्ष अधिक मजबूत झाला आहे.यावेळी भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक पंढरीनाथ नगरसेवक, विश्वनाथ दाचावार, माजी नगरसेवक श्रीनिवास जिठ्ठावार, संतोष पाटील शिवशेट्टे, दिनेश दाचावार, हणमंतराव बेजगमवार, माजी नगरसेवक पंढरी पुपलवार,मोहम्मद अफजल आदी जण यावेळी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

बातम्या

सोयाबीन व कापूस या पिकांचे मोठ्या नुकसान झाले आहे या दोन पिकांसाठी सरसकट विमा लागू करावा- पांडूरंग शिंदे

               नांदेड जिल्ह्यातील विशेषतः नायगाव तालुक्यातील परतीच्या पावसाने हातात आलेले पीक गेल्याने शेतकरी हावादीन झाला आहे, दिवाळीच...