कुंडलवाडी वार्ताहर
ईदूल फितर रमजान ईद निमित्त शहरातील मुस्लिम समाज बांधव ईदगाह येथे सामुहिक नमाज आदा केली. यावेळी ईदगाह समितीचा वतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आले.मान्यवरातर्फे मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा देण्यात आले.
शहरातील ईदगाह येथे दि.21 मार्च शनिवार रोजी शहरातील सर्व मुस्लिम बांधव ईदगाह येथे शांततेत सामुहिक ईदची नमाज आदा केली.
यावेळी हाफिज वसिमसाब मिस्बाही ईद निमीत्त उपस्थिताना ईदचे महत्व आदी विषयावर प्रवचन देत ईदगाह समितीने मागील एक वर्षाचा कार्यकाळात ईदगाह येथे केलेल्या विकास कामा संदर्भात माहिती दिली.मुन्वर मस्जिदचे ईमाम हाफिज वसिमसाब मिस्बाही यांच्या मागे शांततेत उत्साहात मुस्लिम समाज बांधव ईदची सामुहिक नमाज आदा केली.यावेळी खुदबाह आणि दुवा जामा मस्जिदचे ईमाम आलीम खुदूस साहाब यांनी केले.तदनंतर ईदगाह समितीचा वतीचे अध्यक्ष सय्यद मंसूर अली,उपाध्यक्ष मोहम्मद अफजल व समितीचे सदस्य यांच्यावतीने नगर परिषद नगराध्यक्ष प्रतनिधी गजानन कोटलावार,सपोनी.ज्ञानेश्वर शिंदे,पोउनी.गजेंद्र मांजरमकर,तलाठी पवण ठकरोड,भाजप गटनेते रमेश ईरलावार,नगरसेवक प्रदीप खेळगे,भाजपचे नवनियुक्त मंडळ अध्यक्ष बंटी ठकरवाड यांचा सत्कार करण्यात आला.मान्यवरातर्फे मुस्लिम समाजबांधवांना ईदच्या शुभेच् देण्यात आले.
यावेळी ईदगाह समितीचे अध्यक्ष सय्यद मंसूर अली,उपाध्यक्ष मोहम्मद अफजल,ईदगाह समितीचे माजी अध्यक्ष सय्यद ईसताक अली,रशिदखान पठाण, गुलजार मस्जिद हाफीज गुलाम यासीन साहाब,हाफीज अमीरूल हसन साहाब,हाफीज मुस्ताख साहाब,मुन्वर मस्जिद अध्यक्ष मोहम्मद नजिर मोहम्मद ईसाख,पठाण नजिर मौलाना,माजी नगरसेवक शेख बशीर सहाब,गुलजार मस्जिद अध्यक्ष हाजी ईब्राहीमसाब,उपाध्यक्ष शेख बशिर साहाब,
बिलाल मस्जिद अध्यक्ष पठाण जलिल सहाब,उपाध्यक्ष हाजी मुजाहिद साहाब,ईदगाह समितीचे सदस्य अ.जावेद हाजी.अ.जलिल,शेख वहाब सिरजोदीन,हाजी अब्दुल करीम खुरेशी,
शेख सलीम अहेमदजानी,शेख अलीम अब्दुलमियाॅ,पठान रियाज मैनोदीन,शेख बशीर मौलाना,आदीसह मोठ्यासंख्येत मुस्लिम समाज बांधव उपस्थित होते.
विशेष म्हणजे नगरपालिका प्रशासनातर्फे ईदगाह परिसरात स्वच्छता आणि मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आले होते.याबद्दल ईदगाह समितीचे उपाध्यक्ष मोहम्मद अफजल नगर परिषद प्रशासन,पोलिस प्रशासन आणि महसुल प्रशासनाचे आभार मानले.
यासाठी ईदगाह समितीतर्फे पाठपुरावा करण्यात आला होता.
ईदगाह येथे कायदा व सुव्यवस्था आबादीत नादावे यासाठी सपोनी.ज्ञानेश्वर शिंदे,पोऊनी.गजेंद्र मांजरमकर कडक पोलिस बंदोबस्त तैनात केले होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा