उपविभागीय अधिकारी (SDM) आदरणीय सौ. क्रांती डोंबे मॅडम यांनी आज आपला वाढदिवस जिल्हा परिषद उच्च प्राथमिक सेमी इंग्लिश शाळा, बेळकोणी बु. येथील विद्यार्थ्यांसमवेत वृक्षारोपण करून पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा केला.यावेळी लोकसहभागातून उभारण्यात आलेल्या सेमी डिजिटल लॅबचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच शाळेत राबविण्यात येत असलेल्या विविध शैक्षणिक व विकासात्मक उपक्रमांची त्यांना सविस्तर माहिती देण्यात आली.
मिशन आपुलकी अंतर्गत गावातील माजी विद्यार्थी, ग्रामस्थ तसेच विविध क्षेत्रातील संस्था शाळेच्या भौतिक सुविधा बळकट करण्यासाठी करत असलेले योगदान अत्यंत उल्लेखनीय असल्याचे सांगत त्यांनी प्रशासनाच्या वतीने सर्वांचे मनःपूर्वक कौतुक केले.
पुढील दोन वर्षांत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक सेमी इंग्लिश शाळा, बेळकोणी बु. ही नांदेड जिल्ह्यातील तसेच महाराष्ट्रातील आदर्श व नामांकित जिल्हा परिषद शाळांपैकी एक म्हणून निश्चितच ओळख निर्माण करेल, असा विश्वास व्यक्त करत त्यांनी शुभेच्छा दिल्या.
यावेळी SIR चे सुमारे ९० टक्के काम पूर्ण झाल्याबद्दल जिल्हा परिषद उच्च प्राथमिक सेमी इंग्लिश शाळेचे BLO सचिन बिरकुरे, तसेच कुऱ्हाडे सर यांच्या उत्कृष्ट कार्याचे विशेष कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.याप्रसंगी मंडळ अधिकारी आंबेराय लक्ष्मीकांत, सामाजिक कार्यकर्ते बळीराम ईरलेवाड
शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष थोंटेवाड ज्ञानेश्वर,
अमृतालयचे मुख्य कार्यकारी अधिकारी माधव तरकंटे,पोलिस पाटील गंगाधर येळगे, ग्रामपंचायत सदस्य बालाजी लिंगम, संजय वच्चेवार, पवन बुध्देवार SIR पर्यवेक्षक कोंडावर सर,सर्व अंगणवाडी कर्मचारी,आशा वर्कर,शिक्षणप्रेमी पालक तथा नागरिक,शाळेचे उच्चश्रेणी मुख्याध्यापक श्री गणपतराव कोरनुळे,सहशिक्षक संजीव गंजगुडे,शिवराज साधू,शंकर कुऱ्हाडे,सतीश तोटावार,सचिन बिरकुरे,सौ.रंजना चव्हाण,सुषमा पोलशेटवार,कल्पना बोधने आदीसह असंख्य जण उपस्थित होते.
या कार्यक्रमास गावातील ग्रामस्थ, पालक, शिक्षक व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा