बिलोली प्रतिनिधी
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोकण्यासाठी संपुर्ण भारतात लॉकडाऊन करण्यात आले आहे त्या मुळे मोल मजुरी करणा-याचे रोजगार बुडालेल्या बिलोली शहरातील मजुरदार वंचित व कामगारांच्या मदतीला पिंपळगाव ता.नायगाव जव येथील जगदिश कदम परिवार धावून आले असून प्रत्येक कुटुंबाला गहुचे पिठ,तांदूळ, एक किलोचे तेल पाकीट,दाळ,हळद ,मिरची,मिट,लायबॉय साबन, घडीसाबन, देण्याची व्यवस्था करुन शुक्रवारी 51 हजाराची किट वाटप केले. जगदिश कदम यांच्या या सामाजिक उपक्रमाचे बिलोली शहरात कौतुक होत आहे.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारने लाँकडाऊन करण्याचा निर्णय घेतल्याने याचा परिणाम मजुरदार व लहान व्यवसाईक यातून कामगार व मजुरदारही सुटले नाहीत. सर्वच व्यवहार ठप्प असल्याने मजुरदारावर मोठे संकट ओढवले आहे. या संचारबंदीच्या काळात हाताला काम मिळत नसल्याने संसाराचा गाडा कसा चालवायचा असा प्रश्न कामगारासमोर उभा टाकला आहे.
सध्या उदभवलेली परिस्थिती पाहून सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार मा अशोकरावजी चव्हाण यांचे कट्टर समर्थक जगदिश विश्वनाथ कदम पिंपळगाव कर ता नायगाव यांनी माणुसकीचा गहिवर दाखवत. सध्या उद्भवलेल्या परिस्थितीत हातावर पोट असलेल्यांची अवस्था गंभीर झाली असून वंचितांना मदतीचा हात देणे आपले कर्तव्य आहे. या जाणिवेतूनच ही मदत करण्यात आली असल्याचे जगदिश कदम यांनी सांगितले.
धान्याची किट देतानां बिलोली चे तहसीलदार विक्रम राजपुत यांच्यासह ,मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर,नायब तहसीलदार ओमप्रकाश गौंड , जगदिश कदम, यूद्ध कोरोणा ग्रुपचे बिलोली सय्यद रियाज , इंद्रजीत तुडमे,उपनगराध्यक्ष मारोती पटाईत, करीम चाऊस, रावसाहेब मदने, पत्रकार,अली चाऊस, संदिप कटारे ,मारोती भालेराव यांची उपस्थिती होती.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा