ना टीवी, ना अँड्रॉइड मोबाइल...ना...घर न दार...यांचा कसा ताळेबंद...?
ज्यांच्या घरी आहेत दाणे तेथील कुत्रेही शहाणे ...
ज्यांच्या घरी नाही दाणे ती माणसे दिवाने....
बिलोली 3 अप्रील 2020 रोजी कोरणा विषयीचे प्राथमिक ज्ञान देण्यात आले. यावेळी प्रत्येकांना योग्य अंतर ठेवून संवाद साधण्याचा प्रयत्न झाला . या झोपडीत राहणाऱ्यांना ना घर.... ना दार..... ना टीवी.... ना अँड्रॉइड मोबाइल.... अशी अवस्था ठिकाणी दिसून आली.
अशांना कोरोना विषयीची माहिती देण्यात आली . गावाबाहेर न फिरण्याचे शिवाय बाहेरगावच्याना गावात न येऊ देण्याचा सल्ला यावेळी देण्यात आला.
गरीबाच्या झोपडीत जाऊन त्यांच्याशी त्यांच्या परिवाराच्या विषयीचे हितगूज करून, त्यांना तांदूळ डाळ आणि साबणाची वडी देण्यात आली.
भीक मागणाऱ्या आणि गल्लोगल्ली पिना .....काटे...…. विकणाऱ्याच्याही परिवारातील मंडळींना भेटून त्यांना कोरोना विषयीची माहिती देण्यात आली. यात निवृत्त गटशिक्षणाधिकारी के पी सोने, बिलोलीचे सामाजिक कार्यकर्ते गोविंद मुंडकर अर्जापूर चे शिवाजीराव पोरडवार,पी. आय. गायकवाड, श्री सोने, सौ कोपुरवाड आदी सहभागी झाले होते.
उपेक्षितांच्या या वस्तीत विशेष म्हणजे येथे प्रशासनाचा कोणताही व्यक्ती कोणतीही माहिती अथवा मदत घेऊन गेलेला नव्हता
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा