धामणगाव येथील हजरत सय्यद बाबु पिर उर्स संदल रद्द,हजरत सय्यद बाबु पिर उर्स संदल निमित दर्गाह येथे नागरिकांनी जमा होऊ नये- स.पो.नि. भाऊसाहेब मगरे
मुखेड प्रतिनिधी /भारत सोनकांबळे
सद्यस्थितीत देशातच नव्हे तर संपूर्ण जगात
कोरोना या महाभयंकर संसर्गजन्य विषाणू ने थैमान घातले आहे, या कोरोना विषणुपासून बचाव करण्यासाठी जनतेनी घराबाहेर पडू नये म्हणून जनता कर्फुच्या माध्यमातून २१ दिवसाचे
लॉकडाऊन चे आदेश सरकारने दिले आहेत.तसेच देशात सर्वत्र कलम १४४ (जमाव बंदी) लागू करण्यात आला असल्याने मुखेड तालुक्यातील धामणगाव येथे होणारा प्रसिध्द व पारंपरिक हजरत सय्यद बाबु पिर उर्स संदल व यात्रा कोरोनाच संकट व संचारबंदी असल्यामुळे या वर्षी उर्स संदल यात्रा रद्द करण्यात येत असल्याचा निर्णय गावकरी व पोलीस प्रशासनाच्या वतीने नुकताच घेण्यात आला आहे. हजरत बाबु पिर उर्स संदल दि.८ व ९ एप्रिल रोजी आयोजीत करण्यात आला होता.देशातील कोरोना च्या संकटाचे व संचारबंदी ची पार्श्वभूमी लक्षात घेऊन हा महत्त्वपर्ण निर्णय घेण्यात आल्याचे गावकरी व मुखेड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब मगरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले व भाविकांनी याची नोंद घेऊन कोणीही दर्गाह परिसरात जमा होऊ नये,आपल्या घरात आपण सुरक्षित राहून प्रशासनास मदत करावी असे आवाहन केले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा