!
रयत क्रांती संघटनेच्या दुसऱ्या वर्धापनदिनी मागली दोन वर्षांतील संघटनेचा आढावा (Flasback) डोळ्यासमोर जात असताना झालेल्या कार्याचा,उभारलेल्या संघटनाचा,केलेल्या संघर्षाचा एक धावता पट उभा राहतो.
आदरणीय ना.सदाभाऊ खोत यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेतील ही दोन वर्षे खऱ्या अर्थाने माझ्या सारख्या कार्यकर्त्यांला समृद्ध करत गेली. सदाभाऊ च्या सावलीत आपल्या संघटनेचा वटवृक्ष फुलता त्याची पाळेमुळे आपल्या ग्रामीण-शहरी अथवा संबध महाराष्ट्र राज्यात आता खोलवर रुजली आहेत.असेच पुढेही अनेक फांद्यांच्या मार्फत बहरत राहतील आणि रंजल्या गांजलेल्या आपल्या सावलीत आधारवड ठरेल यांची निश्चित खात्री वाटते.
संघटनेच्या वतीने मला समाजातील सर्व स्तरावर काम करण्याची संधी मिळाली आणि भाऊंनी आणि संघटनेणी टाकलेली प्रत्येक जबाबदारी प्रामाणिकपणाने निभावण्याची दक्षता मी घेतली व घेत राहणार या बाबत शंका नसावी. आपण सर्वजण मिळून उदात्त कार्यासाठी उभारलेल्या ,निरपेक्ष हेतूने चालेल्या संघटनेच्या कार्याचा एक भाग,एक धागा आहोत याचा गर्व वाटतो,अभिमान वाटतो तसेच ना.सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वात ही संघटना गेल्या दोन वर्षात सत्तेत राहून सुद्धा तिचा कोणताही आविर्भाव न बाळगता जनतेसोबत मिळून मिसळून त्याच्या समस्या सोडवण्यासाठी सत्तेचा सदुपयोग करत आहे. आरोग्य क्षेत्रात भाऊंच्या मार्फत मला अनेक गरजूवंताना मदत करता आली यांच मोठं समाधान आहे,राज्यातील तसेच माझ्या नांदेड जिल्ह्यातील अनेक गावात पाणीपुरवठा योजना मंजूर करून घेतल्या यामुळे माझ्या मायमाऊली डोक्यावर हंड्याचे ओझे कमी होणार यांचा फार मोठा आनंद होत आहे,अशी सांगण्या सारखी खुप उदाहरण आहेत.
येणाऱ्या काळामध्ये आपल्या संघटनेचे नेतृत्व आणखी मोठे करूया आणि सदाभाऊंच्या हाताला मोठं बळ देऊन संघटनेची ताकत वाढविण्याचे काम आपण सर्वांनी मिळून करायचे आहे.
नेतृत्व ,समाजकारण,राजकारण, सत्ताकारण याबाबत माझ्या मनात कायमच एक विचार राहिला आहे तो म्हणजे " जे सद्या दिन-दुबळे आहेत, गरीब परिस्थितीने वंचित आहेत त्याच्यासाठी काहीतरी चांगलं करणं आणि ज्यांचं बरं किंवा चांगला आहे त्याच्यासाठी चांगल करणं" हाच हेतू आपण सर्वजण कामाला लागूयात येणाऱ्या काळात आपल्या कामाची उंची इतकी वाढवूयात की इतिहास आपली नोंद ठेवेल. राज्यात येणाऱ्या काळात आपली संघटना एक शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी, महिला यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सक्षम पर्याय असेल ही आशा आहे आणि अपेक्षा सुद्धा..
सर्वांना दुसऱ्या वर्धापणाच्या हार्दिक शुभेच्छा...!!
धन्यवाद..
आपलाच,
पांडुरंग शिंदे
प्रदेशाध्यक्ष,(युवा)
रयत क्रांती संघटना.
महाराष्ट्र राज्य.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा