नायगाव विधानसभा क्षेत्रातील भारतीय जनता पार्टी म्हणजे भूमिपुत्रांच्या त्याग, आणि समर्पित जीवनाचे प्रतिबिंब होय -बालाजी बच्चेवार
नायगाव विधानसभा क्षेत्रातील आज नावारूपाला आलेले भारतीय जनता पार्टी ही भूमी पुत्राचा त्याग आणि समर्पित जीवनाचे प्रतिबिंब असून पक्ष उभारनी पासून निष्ठावान कार्यकर्त्यांच्या योगदानाची फलश्रुती आहे. ह्याचा आज मला मनस्वी रास्त अभिमान असून शिवसेना भारतीय जनता पार्टीच्या प्रखर विचारधारेशी मी कटिबद्ध आहे.
मागच्या तीन दशकांच्या कार्यकाळात मन ,मस्तक, आणि मनगटाच्या बळावर भारतीय जनता पार्टी स्थापन करून वाढवली शेतकरी शेतमजूर गोरगरिबांचे पोरं बाळा सोबत घेऊन पाठीवरच्या भावासारखे कार्यकर्ते सावलीसारखे माझ्या पाठीशी खंबीर उभे राहिले त्यामधूनच विरोधकांना कडवा संघर्ष केला अनवाणी संघर्षाच्या ठिणग्या पडल्या रक्त सांडलं त्या सांडलेल्या रक्तातून कार्यकर्त्यांच्या वाहणाऱ्या घामातून निष्कलंकिंत जीवन प्रवासातून इमानदारी आणि निष्ठेतून उदयास आलेलि आपलि भारतीय जनता पार्टी नायगाव विधानसभा क्षेत्रात अनेक नवे विक्रम घडवल्ली नायगाव बिलोली तालुक्यात घराणेशाही ने आपले प्रस्त ठाण मांडून होते बहुजनवादी विचारसरणीच्या आमच्या कार्यकर्त्यांनी हळू हळू प्रस्थापितांचे गड उद्ध्वस्त केले, खीळ खीेळ केले. आणि भाजपाचा झेंडा दिमाखाने फडकवला.
गावागावात शाखा स्थापन करून आपला त्याग आणि संपूर्ण जीवन आम्ही समर्पित केलंय आणि त्या त्यागाचं आणि समर्पित जीवनाचं मूर्तिमंत प्रतिबिंब म्हणजे नायगाव विधानसभा मतदारसंघातील भाजपा होय आणि त्या विचारधारेशी मी कटिबद्ध आहे. त्याच उमंग भऱ्या उत्साहाने कार्य अविरत चालू राहील.
बंधू आणि भगिनींनो लोकशाहीच्या महोत्सवात प्रत्येकालाच आपण नेतृत्व करावे आपण उमेदवार असावे असे वाटते तो त्यांचा हक्क असतो मी पण पक्ष नेतृत्वाकडे नायगाव विधानसभेचे उमेदवारी मागितली होती .मला मी केलेल्या कार्याची पावती म्हणून ,बहुजनांचे नेतृत्व म्हणून ,गरिबांचे नेतृत्व म्हणून, काम करण्याची संधी मागितली होती. अनेक अडथळ्यांची शर्यत पार केली "पण मी अजून त्या योग्यतेचा झालो नसेल" म्हणून नेतृत्वाने मला संधी दिली नाही पण भावांनो मी कुठेही कमी पडलो नाही मी काल हे नेतृत्व करण्याच्या योग्यतेचा होतो मी आजही योग्यतेचा आहे मी उद्या पण नायगाव विधानसभेच्या नेतृत्वाच्या योग्यतेचा आहे आजपर्यंत बऱ्याच वेळा प्रयत्न करूनही मला पक्षाची उमेदवारी मिळाली नाही कदाचित पक्ष नेतृत्वाला मला याहीपेक्षा मोठी जबाबदारी आणि संधी द्यायची असेल म्हणून ही संधी दिली नसावी. त्यामुळे मी पक्ष नेतृत्वाकडे काल ही तक्रार केली नाही आजही तक्रार करणार नाही पक्षाच कार्य अविरत करणार हे मात्र निश्चित.
आयुष्यात कितीही कठीण
प्रसंग आले तर
तक्रार करू नका
कारण "देव" असा डायरेक्टर आहे
तो कठीण रोल नेहमी
बेस्ट एक्टर्सलाच देतो.
म्हणून अशा प्रसंगी स्वतःचा संयम ,आणि पक्षाचा आदेश हाच माझ्यासाठी शीरसलामत आहे त्यासाठी मी एवढंच म्हणेन.
आज भूमिपुत्र तुझा
घायाळ झाला इतका
मृत्यूवास घाबरत नाही
न्यायाचा तराजू तुझा
झुकत का नाही
काळीज तुझे भगवंता आज
का पाझरत नाही..!!?
बस ह्या पेक्षा जास्त काय सांगाव्या व्यथा, मन हेलावते ते माझ्या कार्यकर्त्याँसाठी नायगाव मतदार संघातील भाजपाच्या जडणघडणीत माझ्या कार्यकर्त्यांचे मोठी जबाबदारी होती ,तेच माझे कार्यकर्ते जागोजागी विरोधकांना अडले, नडले ,आणि जोमाने भीडले. हे कार्यकर्त्यांचे योगदान मी कधीही व्यर्थ जाऊ देणार नाही.
माता-भगिनींनो मित्रांनो मी नाराज नाही, मी खचलो नाही, मी थांबलो नाही असे प्रसंग अनेक वेळास अनुभवले आहे .फक्त वाईट ह्याच गोष्टीचे वाटते वेळोवेळी जनभावनेचा विचार व्हायला हवा होता .?येणाऱ्या काळामध्ये यावर विचार मंथन होईल नक्कीच पक्ष आपल्या सोबत जरूर जरूर न्याय करेलच ही माझी माझ्या पक्षावर दृढ श्रद्धा आहे ,विश्वास आहे.
म्हणून माझ्यावर प्रेम करणाऱ्या आज जनता जनार्दनाना ,माझ्या समर्थकांना मी नम्रपणे सांगू इच्छितो .आपण दिलेले योगदान, आपण केलेले कार्य ,आपण माझ्यावर दाखवलेला विश्वास, आज वर दिलेली साथ ,आपली मायेची सावली अशीच राहू द्या. नजीकच्या काळात आपला विश्वास आणि त्याची परतफेड व्याजासकट निष्ठेने काम करून परत करेन. तुम्ही पाहिलेले स्वप्न साकार करेन भावांनो "अपने सपने सच होंगे "हा विश्वास हा शब्द हे वचन मी आपला माणूस बालाजी बच्चेवार आपणास देतो. माझ्या आजवरच्या राजकीय कठीण काळात पक्ष स्थापनेपासून विविध आंदोलनात ,संघर्षात तुम्ही साथ दिली अनेक प्रकारचे आपल्यावर चौफेर हल्ले झाले पण तुम्ही कधी नाउमेद झाला नाहीत ,जमिनीवर पाय रोवून माझ्यासाठी ठाम उभे राहिलात पक्षाचं कार्य हे राष्ट्रीय कार्य समजून ,पक्षाचे कार्य हे ईश्वरीय कार्य समजून माझ्या संघर्षमय जीवनात राजकीय कारकिर्दीत जनता जनार्दन आणि ,माझे कार्यकर्ते जीव पणाला लावून माझी साथ सोबत केली, आपला पक्ष लोकप्रिय केलात त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.
तुमची ताकद ,तुमचा विश्वास, तुमचं बळ गोर गरीब माणसं हेच बालाजी बच्चेवार च्या सोबत होते म्हणून आपण प्रतिकूल परिस्थितीत प्रस्थापितांच्या, घराणेशाही च्या विरोधात लढलो झगडलो, मुकाबला केला अनेक निवडणुका लढल्या पक्षाचा विस्तार केला पक्षाचा विजय केला.
भावांनो बालाजी बच्चेवार फार लहान माणूस आहे पण जे काही आहे ते तुमच्या मुळेच आहे. नायगाव धर्माबाद उमरी मध्ये जे कार्य केले उघड ,उघड खडकाला धडक दिली आणि फार मोठ्या कठीण प्रसंगातून भाजपा ची स्थापना केली एक इतिहास घडवला .हा इतिहास पुन्हा घडवण्यासाठी सज्ज राहा
नायगाव विधानसभा क्षेत्रातील तीच आपली भारतीय जनता पार्टी म्हणजे भूमिपुत्रांचा त्याग आणि समर्पित जीवनाचे प्रतिबिंब होय त्या आपल्या भाजपाचा मला सार्थ अभिमान आहे आणि त्याच विचारधारेशी मी कटिबद्ध आहे .!!
मी उतणार नाही मी मातणार नाही. घेतला वसा टाकणार नाही.येणारा काळ नक्कीच आपला असेल....!!आपलाच कृपाभिलाषी कार्यकर्ता गणेशराव बच्चेवार,यगाव विधानसभा
आपण भाजपा साठी दिलेले योगदानाची पक्षाने नोंद घ्यावी ही कळकळीची विनंती आहे,
उत्तर द्याहटवाभारतीय जनता पार्टीने...
श्री बालाजी बच्चेवार यांनी नायगांव च्या विकासा साठी कित्येक वेळा अंदोलन केली,कित्येक वेळा जेल मध्ये गेले ह्याची नोंद आहे..
ह्या पुढे भविष्यात पक्षाने एका निष्ठावंत कार्यकर्त्याचा चा विचार करावा...
पक्षामुळे कार्यकर्ता-कार्यकर्त्यां मुळे पक्ष चालतो...