२८ जून २०१९

झारखंड येथील प्रकरणातील आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा देण्यात यावी- जावेद अहेमद



देगलूरात उपजिल्हाधिकारी मार्फत राष्टपतींना निवेदन देण्यात आले

 देगलूर ( प्रतिनीधी )                         
 झारखंड मध्ये तबरेज अन्सारी ला बेदम मारहाण करून मारणार्यांना फाशीची  शिक्षा व्हावी व माॅबलिंचींग च्या विरोधात कडक कायदा तयार करण्यात यावा व मुस्लिम समाजाला अॅट्रोसिटी कायदा लागु करावा.या मागणीचे निवेदन उपजिल्हाधिकारी देगलूर मार्फत राष्टपतींना बहुजन बांधावांकडुन देण्यात आले.
 झारखंड मध्ये  तबरेज अंसारी नावाच्या मुस्लिम युवकाला खांबाला बांधुन बेदम मारहाण करीत त्याला जबरदस्तीने जय श्री राम चे नारे देण्यास भाग पाडले. व त्याचा जीव जाई पर्यंत  त्याला जमावाने मारले आणि  ही सगळी घटना कॅमेरा मध्ये रेकॉर्ड करुन सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आली जेणेकरून मुस्लिम समाजा मध्ये भय चे वातावरण तयार व्हावे व देशात सध्या कायदा सुव्यवस्था बिघाडण्याचे काम काही समाजकंटक करीत आहेत व माॅबलिंचींग करुन गेल्या काही वर्षांत आत्ता पर्यंत     अखालख,मोहसीन शेख,पहलू खान,जुनेद आणि अत्ता तबरेज अंसारी असे किती नाहक बळी जाणार आहेत. माॅबलिंचींग च्या विरोधात कडक कायदा तयार करून या समाजकंटकाचे मुसक्या आवळले पाहिजे जेणेकरून देशाची शांतता भंग होणार नाही आणि देशात मुस्लिम समाजाला अॅट्रोसिटी कायदा लागु करुन मुस्लिम समाजाला न्याय देण्यात यावा. व तबरेज अन्सारी च्या गुन्हेगारांना फाशी शिक्षा व्हावी .अश्या मागणीचे निवेदन उपजिल्हाधिकारी मार्फत राष्ट्रपतींना देण्यात आले. निवेदन देतांना खालेद पटेल , सय्यद निसार ,निसार देशमुख,सुशिलकुमार देगलूरकर  ,सय्यद बासीत,ना.ना.मोरे,जावेद अहेमद ,हबिब रहेमान( टिपु) ,विकास नरबागे ,शेख शब्बीर ,सय्यद मोहीयोद्दीन ,संदीप राजुरे ,प्रकाश काळे,शेख असलम ,शेख इम्रान,मोहम्मद इलियास बागवान, अॅड. विलायत अली ,भि.ना,गायकवाड ,अब्दुल रज्जाक ,वसीम शहापुरकर ,हमीद शहापुरकर ,अब्दुल हई,शेख आमेर , मोहसीन मनियार पत्रकार  नाजीम ,  शेख इब्राहीम,इस्माईल,शेख मोईन  व असंख्य बहुजन बांधव यावेळी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

बातम्या

सोयाबीन व कापूस या पिकांचे मोठ्या नुकसान झाले आहे या दोन पिकांसाठी सरसकट विमा लागू करावा- पांडूरंग शिंदे

               नांदेड जिल्ह्यातील विशेषतः नायगाव तालुक्यातील परतीच्या पावसाने हातात आलेले पीक गेल्याने शेतकरी हावादीन झाला आहे, दिवाळीच...