मराठा समाजाला आरक्षण लागू झाल्यामुळे मा . ना .देवेंद्र फडणवीस यांच्या शिवशाही सरकारच्या प्रामाणिकतेवर शिक्कामोर्तब झाला आहे मा . ना. देवेंद्र फडणीस यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे हा दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून अत्यंत चाणाक्ष ,अभ्यासू पद्धतीने मराठासमाजआरक्षणाचा विषय हाताळला .म्हणूनच आज माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या शिवशाही सरकारमुळेच मराठा समाज आरक्षणाचा लाभार्थी झाला आहे असे रोखठोक मत माजी जिल्हा परिषद सदस्य, भाजपा नेते मा .श्री .बालाजीराव बच्चेवार यांनी व्यक्त केले बच्चेवार पुढे म्हणाले की आजपर्यंत कुठल्याही सरकारने केला नाही अशा पद्धतीचा धाडसी आणि भक्कम निर्णय करून मागास असलेल्या मराठा समाजाला आर्थिक आणि शैक्षणिक उन्नत करण्यासाठी व त्यांचा विकास व्हावा ह्या प्रामाणिक दृष्टिकोनातून आरक्षण लागू केलं. मराठा समाजाला शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण देणाऱ्या कायद्याला सशर्त मंजुरी आज मुंबई उच्च न्यायालयाने दिली शिवशाही सरकारचा मराठा आरक्षण कायदा वैद्य ठरवला आहे यातच मा ना देवेंद्र फडणीस यांच्या प्रामाणिकतेवर व सरकारच्या प्रामाणिकतेवर आज ह्या निर्णयामुळे शिक्कामोर्तब झाला आहे .हा निर्णय शिवसेना भारतीय जनता पार्टी यांच्या महाराष्ट्राच्या राजकारणावर समाजकारणावर दूरगामी परिणाम करणारा आहे .समाजाच्या नावावर ज्यांनी चाळीस-पंचेचाळीस वर्ष राज्य केले त्यांना जे जमलं नाही ते माननीय फडणवीस यांच्या शिवशाही सरकारने करून दाखवले .जो समाज माननीय देवेंद्र फडणीस यांच्यावर संशय घेत होता ब्राह्मण समाजाच्या मुख्यमंत्र्याकडून मराठा समाजाला न्याय मिळेल का अशा पद्धतीची शंका घेत होता आणि संपूर्ण महाराष्ट्रात अत्यंत दूषित वातावरण तयार करण्यात आलं होतं .काही कथित राजकीय पक्षांना मराठा आरक्षना पेक्षा फडणवीस सरकारला अडचणीत कसे आणता येईल ह्याचे सोयीस्कर राजकारण करत होते त्याला काही समाजातील मंडळी सुद्धा बळी पडत होती परंतू शिवशाही सरकारचा प्रामाणिक हेतू देवेंद्र फडणीस यांची प्रामाणिक तळमळ मराठा समाजातल्या रंजल्या-गांजल्या लोकांचाही विकास झाला पाहिजे ह्या दृष्टीकोनातून माननीय देवेंद्र फडणीस यांनी हा निर्णय घेतला आणि देवेंद्र फडणीस यांनीसुद्धा आपणच महाराष्ट्राचे लोक नेते आहोत हे महाराष्ट्राला सिद्ध करून दाखवलं . मराठा आरक्षणाचे भिजत पडलेले घोंगडे बऱ्याच मुख्यमंत्र्यांना सोडवता आले नाही परंतु मराठा समाजाला आरक्षण देऊन मुख्यमंत्र्याच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा रोवला गेला म्हणूनच देवेंद्र फडणवीस यांच्या शिवशाही सरकारमुळेच मराठा समाज आरक्षणाचा लाभार्थी झाला याचा मला अभिमान आहे शिवशाही सरकारच्या मराठा आरक्षणासंदर्भात बऱ्याच नीकशाशी मा न्यायालयाने संमती दर्शवली व सशर्त मंजुरी दिली जसे की .
वंचित घटकाला आवश्यकता असल्यास राज्य सरकारला स्वतःच्या विशेष अधिकारांमध्ये आरक्षण देण्याचा अधिकार आहे.
मागासवर्गीय आयोगाच्या अहवालानुसार मराठा समाज शैक्षणिक आणि सामाजिक रित्या मागास आहे.
अपवादात्मक स्थितीत पन्नास टक्क्याहून अधिक आरक्षण देता येऊ शकते.
या अनुषंगाने मराठा समाजाला शैक्षणिक आणि शासकीय सेवेमध्ये आरक्षण देणे घटनाबाह्य नसल्याचा निर्वाळा आज मुंबई उच्च न्यायालयाने केला आहे.
त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या शिवशाही सरकारच्या निर्णयाला न्यायालयाकडून सशर्त मंजुरी मिळाली यातच सरकारचे आणि मुख्यमंत्र्यांचे प्रयत्न सफल झाल्यामुळे मुख्यमंत्री जे बोलतात ते करून दाखवतात याची प्रचिती अवघ्या महाराष्ट्राला आली आहे
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा