३१ ऑगस्ट २०२५

हरनाळी ,नागनी व हुनगुंदा गावात आरोग्य तपासणी

 हरनाळी व नागनी


गावात पूर परिस्थिती निर्माण झाली असल्यामुळे हूनगुदा गावात स्थलांतरित झालेले लोकांना आरोग्य तपासणी करण्यात आली व गावात आरोग्य शिक्षण देऊन सगळं गावातील हातपंप बोर यात टी.सी.एल टाकून पाणी शुद्धीकरण करण्यात व कंटेनर सर्वे करून अबेटिंग करण्यात आले  कीटकजन्य आजार जलजन्य आजार या बदल प्रतिबंधक उपाययोजना व उपचारत्मक उपाययोजना करण्यात आल्या यासाठी उपस्थित माननीय जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर देशमुख मॅडम व तालुक्याचे गटविकास अधिकारी पदमवार व तालुक्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर वाडेकर , डॉ सारिका अनमुलवाड मॅडम वैद्यकीय अधिकारी कुंडलवाडी सुपरवायझर यांनी उपस्थित राहून कामाचे पाहणी केली व उपकेंद्र हुनगुंदाचे आरोग्य कर्मचारी समुदाय आरोग्य अधिकारी डॉक्टर रुबिया मॅडम  तसेच आरोग्य सेवक शेखं अर्शद  आरोग्य सेविका साठे  सिस्टर व सर्व आशा यांचे कामाबद्दल कौतुक केले अभिनंदन दिले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

बातम्या

सोयाबीन व कापूस या पिकांचे मोठ्या नुकसान झाले आहे या दोन पिकांसाठी सरसकट विमा लागू करावा- पांडूरंग शिंदे

               नांदेड जिल्ह्यातील विशेषतः नायगाव तालुक्यातील परतीच्या पावसाने हातात आलेले पीक गेल्याने शेतकरी हावादीन झाला आहे, दिवाळीच...