नांदेड - (सय्यद रियाज) जिल्हा हिवताप कार्यालय नांदेड येथील आरोग्य सहाय्यक उमाकांत वाखरडकर यांना दि. ३१ ऑक्टोबर रोजी नियत वयोमानानुसार शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झाल्या बदल जिल्हा हिवताप व हत्तीरोग कार्यालय नांदेड येथील संंयोजन समिती तर्फे निरोप समारंभ कार्यक्रम आयोजित करून निरोप देण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मा.डॉ आकाश देशमुख साहेब जिल्हा हिवताप व हत्तीरोग अधिकारी नांदेड व प्रमुख पाहुणे म्हणून मा.डॉ बालाजी मिरकुटे साहेब तालुका आरोग्य अधिकारी नांदेड , श्री.आर.आर.वाखरडकर सेवानिवृत्त कृषीअधिकारी, बाबुराव वाखरडकर प्रसिद्ध व्यापारी, प्रा.महेश वाखरडकर राज्य स्तरीय कोच बँडमिंटन असोसिएशन, जिल्हा सचिव बँडमिंटन, डॉ विनायक वाखरडकर हे उपस्थित होते.
श्री उमाकांत वाखरडकर हे आरोग्य सेवे मध्ये १९८४ पासून आज पर्यंत अशी प्रदिर्घ सेवा बजावली.
सन २००८-०९ मध्ये जिल्ह्यात मध्ये चिकुन गनिया ची साथ पसरली असताना जिल्हा हिवताप कार्यालय नांदेड अंतर्गत भरारी पथक प्रमुख म्हणून विशेष कामगिरी केली.
तसेच हिवताप व हत्तीरोग कर्मचारी यांच्या वेळोवेळी अडिअडचणी जिल्हाध्यक्ष या नात्याने सोडविण्याचा प्रयत्न केले.
हिवताप पतसंस्थेच्या माध्यमातून चेअरमन,सचिव व संचालक अशी विविध पदे भुषविली.
. श्री संग्राम चमकुरे, दिगांबर देगावे, माणिक गित्ते, रमेश कसबे, राजकुमार ढवळे, गंगाधर गन्लेवार,दिनानाथ जोंधळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अशोक शिंदे, सत्यजीत टिप्रेसवार, सुभाष कल्याणकर, जी.बी.नाईक, देसाई, शेख हुसेन, व्यंकटी बकाल, मनोहर खानसोळे, मोहन पेंढारे, राजीव पांडे, संग्राम चमकुरे, रघुनाथ हुंबे,विलास चाटे व आप्पाराव पोले यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व्यंकटेश पुलकंठवार व सत्यजीत टिप्रेसवार यांनी आभार प्रदर्शन केले..
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा