कृषी राज्यमंत्री ना.सदाभाऊ खोत यांचा नांदेड दुष्काळग्रस्त भागाचा दौरा
नायगाव, बिलोली, धर्माबाद तालुक्यात भेटी..
विशेष प्रतिनिधी
राज्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत हे आज दि.४रोजी नांदेड
दौ-यावर असून जिल्ह्यातील नायगाव,बिलोली,व धर्माबाद तालुक्यातील अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागाची प्रत्यक्षात पाहणी करणार आहेत अशी माहिती रयत क्रांती संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे मांजरमकर यांनी दिली आहे.
राज्यमंत्री सदाभाऊ खोत हे शासकीय वाहनाने नायगाव तालुक्यातील काहाळा (बु), सोमठाना,मांजरम,गडगा व बिलोली तालुक्यातील लोहगाव, पांचपिपळी (फाटा) व धर्माबाद तालुक्यातील बाबळी बंधारा या गावातील अतिवृष्टीने झालेल्या नुकसानग्रस्त पिकांची प्रत्यक्षात पाहणी करणार आहेत व शेतकऱ्यांशी संवाद साधनार आहेत.
तसेच धर्माबाद तालुक्यातील बहचर्चित बाभळी बांधा-याची पाहणी करून बॅकवाटर मूळे नुकसान झालेल्या शेतीचा व पिकांचा आढावा घेणार आहेत व उपस्थित शेतकऱ्यांशी प्रत्यक्षात संवाद साधणार आहेत.तद्नंतर सायंकाळी धर्माबाद येथून देवगिरी एक्स्प्रेस ने मुंबई कडे रवाना होणार आहेत.
अशीही माहिती रयत क्रांती संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे मांजरमकर यांनी दिली आहे व शेतकऱ्यांनी बहुसंख्येने उपस्थित राहून सदाभाऊ खोत सोबत संवाद साधतावा असे अहवाल केले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा