अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना सर्वच पिकासाठी एकरी मदत द्या- केदार साळुंके
नांदेड :-महाराष्ट्रासह नांदेड जिल्ह्यामध्येही अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या सर्वच पिकांचे पहिल्या टप्प्यात मूग, उडीद तर दुसऱ्या टप्प्यात सोयाबीन ,ज्वारी आणि आता कापूस,धान(साळ) पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी नांदेड जिल्हा दौऱ्यावर आलेल्या कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची कृषी विद्यापीठाचे माजी कार्यकारी परिषद सदस्य केदार पाटील साळुंके यांनी भेट घेऊन सर्वच पिकासाठी शासनाने काढलेल्या एकरी उत्पादन खर्चावर आधारित भावाची रक्कम शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून द्यावी अशी मागणी केली आहे .
अतिवृष्टीने संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले आहे त्यामध्ये विभाग निहाय पीक पद्धतीनुसार नुकसान झालेले आहे त्यात मराठवाड्यासह नांदेड जिल्ह्यात मूग, उडीद ,सोयाबीन ,ज्वारी ,कापूस, धान (साळ)या प्रमुख पिकाची लागवड केल्या जाते यात पहिल्या टप्प्यातील पाण्याने मूग व उडीद या पिकाचे नुकसान झाले त्यानंतरच्या दुसऱ्या टप्प्यातील पावसाने सोयाबीन आणि ज्वारी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे सोयाबीन पूर्णता गेले असून ज्वारी काळी पडून जनावर खाण्याच्या लायकीचेही राहिली नाही तर तिसऱ्या टप्प्यातील परतीच्या पावसाने कापसाचे व धान (साळीचे) मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे कापसाचे लागलेले बोंडे पाण्याने सडून जात आहेत व कापसावर लाल्या रोग पडून नुकसान होत आहे धान(साळ) पिकाचे सीमावर्ती भागात मोठ्या प्रमाणात लागवड केल्या जाते ती आडवी पडून पावसाने नुकसान झालेले आहे त्यामुळे अतिवृष्टीने सर्वच पिकाचे नुकसान झाले असल्याने शेतकरी हवालदिल झालेला आहे मागची काही वर्ष कोरडा दुष्काळ व आता अतिवृष्टीने ओला दुष्काळ पडलेला आहे त्यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडलेला आहे शासनाने शेतीचे पंचनामे पाहणी करत बसण्याऐवजी शेतकऱ्याच्या कुटुंबात असणाऱ्या एकूण शेतीच्या क्षेत्रफळानुसार एकरी पिकासाठी उत्पादन खर्चावर आधारित शासनाने काढलेल्या बाजारभावानुसार एकरी सानुग्रह मदत त्यांच्या सातबाऱ्यावरील पीक लागवडीनुसार द्यावी अशी मागणी नांदेड जिल्ह्याच्या पिक पाहणीसाठी आलेल्या कृषी राज्यमंत्री माननीय नामदार सदाभाऊ खोत यांच्या कडे वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माजी कार्यकारी परिषद सदस्य केदार पाटील साळुंके यांनी लेखी निवेदनाद्वारे केली आहे प्रसंगी रयत क्रांती चे प्रदेश युवा अध्यक्ष पांडुरंग शिंदे सह अधिकारी पदाधिकारी उपस्थित होते

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा