०५ नोव्हेंबर २०१९

महागायक आनंद शिंदे यांच्या हस्ते संदीप भुरेंच्या लोकगीत पोस्टर्सचे विमोचन

महागायक आनंद शिंदे यांच्या हस्ते संदीप भुरेंच्या लोकगीत पोस्टर्सचे विमोचन

बिलोली :बिलोली तालुक्यातील मौजे आदमपूर येथील युवा संगीतकार प्रा.संदीप भुरे आदमपूरकर यांनी संगीतबद्ध केलेल्या "कसा डुलयोय यजमानी"ह्या झकास लोकगीताच्या पोस्टर्सचे सोलापूर येथे एका भव्य कार्यक्रमात महाराष्ट्रचे लाडके महागायक आनंद शिंदे मुंबई यांच्या हस्ते विमोचन झाले.

ह्या लोकगीताचे पार्श्वगायक शितलकुमार माने, प्रसिद्ध गीतकार प्रकाश तांबे मुंबई, संगीतकार प्रा.संदीप भुरे आदमपूरकर, ध्वनिमुद्रक प्रकाश माने मुंबई हे आहेत.


गुलशन कुमार प्रस्तुत टी-सिरीज म्युझिक कंपनी मुंबई तर्फे हे गीत रसिक श्रोत्यांना लवकरच ऐकायला मिळेल. ह्याबद्दल गीतकार जाफर आदमपूरकर, पञकार रियाज सय्यद , पञकार काशिनाथ वाघमारे, पञकार मारोती भुसावळे,पञकार दिलीप भुसावळे,पञकार धम्मदिप भुसावळे,तानसेन लोकरे, सिद्धार्थ गजघाटे सोलापूर, प्राचार्य मारोती पिन्नरवार, प्रा. सुनिल भुरे, सिध्दार्थ भुरे, कपिल भुरे, जनजीवन भुरे, महायान सावळे, प्रज्योत माने मुंबई, हणमंत भुसावळे, रणजित भुसावळे, दिलीप भुरे, इत्यादिंनी अभिनंदन केले आहे.

1 टिप्पणी:

बातम्या

सोयाबीन व कापूस या पिकांचे मोठ्या नुकसान झाले आहे या दोन पिकांसाठी सरसकट विमा लागू करावा- पांडूरंग शिंदे

               नांदेड जिल्ह्यातील विशेषतः नायगाव तालुक्यातील परतीच्या पावसाने हातात आलेले पीक गेल्याने शेतकरी हावादीन झाला आहे, दिवाळीच...