बिलोली - सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाअंतर्गत डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे तर्फे कार्य करणारे तालुका समतादूत शेख इर्शाद मौलाना यांच्या तर्फे चालता बोलता व प्रश्न मंजुषा कार्यक्रम घेण्यात आले.
सविस्तर वृत्त असे कि, लोहगाव येथे शिक्षणापासून वंचित असलेला घटक चित्तोडिया समाज गेल्या अनेक वर्षांपासून जंगलात वास्तव्यास आहे सदर समाजाच्या विद्यार्थी व पालकांना वेळोवेळी मार्गदर्शन करून तालुका समतादूत शेख आय.एम.यांनी गेल्या ०४ वर्षांपासून शिक्षणाचे महत्व पटवून दिले त्याचे फलित म्हणजे आज ह्या समाजातील एकूण १८ विद्यार्थी शिक्षणाचे धडे गिरवत आहेत .एकूणच तालुक्यामध्ये ४८ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत .तसेच ०७ नोव्हेंबर विद्यार्थी दिवसाच्या अनुषंगाने मार्गदर्शन करताना सांगितले कि. भारतीय घटनेचे शिल्पकार आणि वंचितांचे उद्धारकर्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पहिल्यांदा शाळेत प्रवेश घेतला तो ७ नोव्हेंबर हा सर्व शाळांमध्ये विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी सातारा येथील प्रतापसिंह हायस्कूलमध्ये ७ नोव्हेंबर १९०० रोजी प्रवेश घेतला. त्यांच्या शैक्षणिक जीवनाची तेव्हापासून सुरुवात झाली. बाबासाहेबांना लहानपणी भिवा म्हणत. शाळेच्या त्या वेळच्या रजिस्टरमध्ये १९१४ क्रमांकाच्या समोर त्यांची स्वाक्षरी आहे. हा दस्तऐवजही शाळेने जपून ठेवला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनात शिक्षणामुळे क्रांती घडली. त्यांनी ज्ञानाच्या जोरावरच भारतीय समाजात क्रांती घडविली. जगात गौरव होत असलेल्या भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार ते ठरले. ते आजन्म विद्यार्थी होते. म्हणून त्यांचा शाळाप्रवेश दिवस राज्यात विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला.असे सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.या दिवशी शाळांमध्ये बाबासाहेबांच्या जीवनावर आधारित व्याख्याने, निबंध स्पर्धा, वत्कृत्व स्पर्धा, अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात सांगण्यात आले आहे.
ह्याच अनुषंगाने सध्या शाळेला सुट्ट्या असल्या कारणाने तालुका समतादूत शेख आय.एम.यांनी सदर जंगलात वास्तव्यास असलेल्या चित्तोडिया समाजातील विद्यार्थ्यांची व पालकांची भेट घेऊन विद्यार्थी व पालकांसाठी चालता बोलता (प्रश्न मंजुषा ) कार्यक्रमध्ये डॉ.बाबासाहेबांच्या जीवनावर आधारित प्रश्न विचारले व उत्तरे देणाऱ्या विद्यार्थी व पालकांना बक्षीस स्वरूपात वह्या व पुस्तके देण्यात आले .
सदर कार्यक्रम करण्यासाठी बार्टी चे महासंचालक मा.कैलास कणसे व समतादूत प्रकल्पाच्या मुख्य प्रकल्प संचालिका मा.प्रज्ञा वाघमारे तसेच नांदेड जिल्हा प्रकल्प अधिकारी तथा सहा.प्रकल्प संचालिका सौ.सुजाता पोहरे यांनी वेळोवेळी मार्गदर्शन करत आहेत
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा