नांदेड- (सय्यद रियाज ) राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमा अंतर्गत जिल्हा हिवताप कार्यालय,जिल्हा क्षयरोग नियंत्रण समिती तथा माता रात्नेश्वरी सेवाभावी शिक्षण संस्था झरी यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता निरीक्षक,एम.एस.डब्लू, अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमा अंतर्गत येणाऱ्या आजारा विषयी माहिती होण्याकरिता कार्याशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वच्छतादूत मा. माधवराव पाटील झरीकर तर प्रमुख पाहुणे म्हणून नांदेड दक्षिण चे आमदार मोहन आण्णा हंबर्डे,रंगनाथ गायकवाड,माधव जाधव होते.जिल्हा हिवताप,हत्तीरोग आणि क्षयरोग कार्यालयातील श्री राजीव पांडे आरोग्य पर्यवेक्षक, श्री व्यंकटेश पुलकंठवार आरोग्य सहाय्यक, श्री रविंद्र तेलंगे किटक समहारक, डॉ.संगीता गादेवार,ज्योती डोईबोळे,ललिता लिल्हारे यांनी किटकजन्य आजारा विषयी माहिती,स्लाईड शोद्वारे,लारवा,डास,व गप्पी मासे याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले.
डासांचे प्रकार,जीवनचक्र,कोरडा दिवसाचे महत्व,डासोउत्पती स्थाने माहिती,गप्पी माशाचे महत्व,प्रतीबंधात्मक उपाययोजना,क्षयरोगाचे लक्षण व निदान,आणि विद्यार्थ्याच्या प्रश्नांचे निराकरण करण्यात आले.
या कार्यक्रमास विद्यार्थ्याची संख्या लक्षणीय होती.या कार्यशाळेसाठी सचिन पाटील झरीकर,प्रभाकर ठोळे,डॉ.वैशाली कंधारकर,प्रल्हाद भारती यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचलन लखन कत्तेवार यांनी तर आभारप्रदर्शन तानाजी परके यांनी केले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा