उदगीरः अलिना बहुउद्देशिय सेवाभावी संस्था उदगीर द्वारा संचलित हजरत बिबी फातेमा ट्रेनिंग सेंटर व जिल्हा उद्योग केंद्र लातूर, मिटकाॅन कन्सलटन्सी इंजि. सव्र्हिसेस लि. पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित फॅशन डिझाईन प्रशिक्षणाचा निरोपसोहळा संपन्न झाला. अध्यक्षस्थानी महाराष्ट्र उदयगिरी माविद्यालयाचे प्रा.एस.एस. पाटील होते. प्रमुख पाहुणे एन.यू.एल.एम. नगर परिषद चे अधिकारी विशाल गुडसूरकर, रोटी कपडा बॅंकेचे सचिव शेख गौस, कोशाध्यक्ष डाॅ.खुरशीद आलम, प्रा.सय्यद अखिल, सतीश नकाशे, पत्रकार खिजर मुनषी, डाॅ.अतिख, विवेक नागुरे, शिक्षिका शेख फरहीन संस्थेचे अध्यक्ष शेख अनवर सदस्य शेख पाशा शेख युनूस, शेख शिफा, शेख नाजीम यांची उपस्थिती होती. सूत्र संचलन प्रा. अश्वीन वळवी यांनी केले. प्रास्तावीक संस्थेचे सचिव शेख अजिमोदीन यांनी केले. प्रशिक्षणाथ्यातर्फे कोमल देडे, श्वेता कांबळे, नेहा पकोडे, उत्कर्षा गायकवाड यांनी मनोगत वयक्त केले. श्री गुडसूरकरांनी प्रशिक्षणाच्या फायदा घेऊन गृहउद्योग करण्याचे आवाहन करून नवनवीन योजनांची माहिती दिली. समारोपात प्रा.पाटील म्हणाले महिलांनी जे प्रशिक्षण घेतले आहे त्याचा बचत गटाच्या माध्यमातून उद्योग उभारून, रोजगार निर्माण करू शकता. आभार सोनी सोमवंशी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशिक्ष्णार्थी व संस्थेचे सदस्यांनी परिश्रम घेतले.
!
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा