१३ नोव्हेंबर २०१९

मिस्त्री कामगार संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी संजय धनगरे यांची बिनविरोध निवड



बिलोली ता.प्र.मार्तंड जेटे बिलोली तालुक्यातील मिस्त्री कामगारांची शहरातील मारोती मंदिरात ९ नोव्हेंबर रोजी बैठक पार पडली, या बैठकीत मिस्त्री कामगारांच्या तालुका संघटनेबाबत चर्चा करून कार्यकारणी करण्याचे ठरविण्यात आले, यामध्ये नामवंत मिस्त्री संजय धनगरे यांची बिनविरोध तालुकाध्यक्ष पदी निवड करण्यात आली.
 गेल्या काही वर्षापुर्वी राज्यातील मिस्त्री कामगारांच्या व्यथा व समस्या समजून घेऊन त्यांना संरक्षण देण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने मिस्त्री कामगारांसाठी विविध शासकिय योजना लागू केल्या आहेत, यामध्ये मिस्त्री कामगार व त्यांचे कुटुंब सुरक्षित राहण्यासाठी तालुका प्रशासनाने तालुक्यातील मिस्त्री कामगारांचे आपल्या कार्यालयात नोंद केली व तसे काही वर्षापुर्वी प्रमाणपत्र दिले, तेंव्हा सदर कामगारांची तालुकास्तरावर असलेल्या इतर राजकिय, सामाजिक, शैक्षणिक, कामगार संघटेने सारखे आपली सुध्दा एखाद्या संघटनेसोबत नोंद असावी या उद्देशाने शनिवार दि ९ नोव्हेंबर रोजी शहरातील मारोती मंदिरात बैठक घेऊन मिस्त्री कामगार संजय धनगरे यांची मिस्त्री कामगार संघटनेच्या बिलोली तालुकाध्यक्ष पदी बिनविरोध निवड करण्यात आली. या संघटनेच्या कार्यकारणीत संजय कुडके (सचिव),  सतिष जेठ्ठे (उपाध्यक्ष), गंगाधर पोतुलवाड (सहसचिव), शिवाजी कोपुरवाड (कोषाध्यक्ष), प्रदिप पोवाडे, रघुनाथ कटारे, माधव पोवाडे, शंभु शिरोड आदींची सल्लागार पदी निवड करण्यात आली. यावेळी तालुक्यातील मिस्त्री कामगार उपस्थित होते, या संघटेनेच्या निवडीबद्दल सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

बातम्या

सोयाबीन व कापूस या पिकांचे मोठ्या नुकसान झाले आहे या दोन पिकांसाठी सरसकट विमा लागू करावा- पांडूरंग शिंदे

               नांदेड जिल्ह्यातील विशेषतः नायगाव तालुक्यातील परतीच्या पावसाने हातात आलेले पीक गेल्याने शेतकरी हावादीन झाला आहे, दिवाळीच...