१९ जुलै २०२५

आदिवासी आश्रमशाळा साळवाडी येथे डॉ संगीता देशमुख जिल्हा आरोग्य अधिकारी यांची भेट व आरोग्य तपासणी शिबीर

 




भोकर :-  आज दिनांक , १९ जुलै २०२५ रोज शनिवारी, भोकर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र भोसी, उपकेंद्र पांडुरना अंतर्गत मौजे साळवाडी येथील 

आदिवासी आश्रमशाळेतील मुला-मुलीच्या आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा परिषद नांदेड येथील जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संगीता देशमुख मॅडम यांनी पांडूरना गावातील, आश्रम शाळेत भेट देऊन पाहणी केली व तेथील मुला-मुलींचे आरोग्य तपासणी शिबीर भेट देऊन मुला मुलींना. आरोग्य विषयावर व पावसाळ्यात आरोग्यासाठी घ्यावयाची दक्षता, साफसफाईवर विशेष लक्ष देण्यासाठी सांगितले. राष्ट्रीय किटक जन्य रोग नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत, डेंग्यू, हिवताप, हत्तीरोग व डासा मार्फत होणारे आजार या बदल माहिती, आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळण्याचे महत्व सांगितले, डास, गप्पी मासे यांचे विद्यार्थी यांना प्रात्यक्षिक दाखविले. आश्रमशाळेतील साठवण हौद येथे गप्पी मासे सोडण्यात आले.


यावेळी आश्रमशाळेचे बालाजीराव शिंदे, प्रास्ताविक व सूत्रसंचालन माधव शिंदे यांनी केले आश्रम शाळेतील सर्व शिक्षक, कर्मचारी होते. भोकर तालुका आरोग्य अधिकारी डॉ संदेश जाधव, प्राथमिक आरोग्य केंद्र भोसी येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.शिवानी राठोड, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.जगदीश राठोड, डॉ.अर्चना गिरी, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी सोनुले,

जिल्हा हिवताप कार्यालय नांदेड येथील किटक समहारक शंकर मलडोले, हत्तीरोगचे गजानन कंकाळ, प्रदीप गोधने, आरोग्य सहाय्यक शेख रहीम, आरोग्य साह्ययिका संगीता गिरी पांडुर्णा उपकेंद्राचे आरोग्यं सेवक साईनाथ माकुरवार, आरोग्य सेविका श्रीमती भाग्यश्री जाधव, श्रीमती रचलवार, श्रीमती  सरपाते, आरोग्य सेवक, सरोदे महादू व वाकळे स्वप्नील व प्रा आ केंद्र भोसी व पांडुर्णा उपकेंद्र अंतर्गत सर्व आशा वर्कर, वाहन चालक सुभाष गवळे व गणेश अंबेकर यांची उपस्थिती होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

बातम्या

सोयाबीन व कापूस या पिकांचे मोठ्या नुकसान झाले आहे या दोन पिकांसाठी सरसकट विमा लागू करावा- पांडूरंग शिंदे

               नांदेड जिल्ह्यातील विशेषतः नायगाव तालुक्यातील परतीच्या पावसाने हातात आलेले पीक गेल्याने शेतकरी हावादीन झाला आहे, दिवाळीच...