कुंडलवाडी प्रतिनिधी
येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दि.18 जुलै रोजी शहर व परिसरातील पाच उपकेंद्रातील 35 महिलांवर बिनटाक्याची कुटूंब कल्याण शस्त्रक्रिया
करण्यात आली.या सर्व शस्त्रक्रियेला सर्जन डॉ.अशोक बेलखोडे,तालुका पर्यवेक्षक आनंद कदम,येथिल प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ.सारिका अनमुलवाड आणि त्यांचे आरोग्य कर्मचारी परिश्रम घेतले.
जिल्हा परिषद नांदेड आरोग्य विभागातर्फे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला वार्षीक कुटूंब कल्याण शस्त्रक्रिया सबंधी उद्दिष्ट देण्यात येते यावर्षी पण प्राथमिक आरोग्य केंद्रास 168 शस्त्रक्रिया उद्दिष्ट देण्यात आले.
यापुर्वी तीन टाक्याचा कुटूब कल्याण शस्त्रक्रियेत 6 महिलाची शस्त्रक्रिया करण्यात आले होते.पण काल झालेल्या शस्त्रक्रिया अभियानात तालुका अरोग्य अधिकारी गणपत वाडेकर यांचा मार्गदनाखाली येथिल प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ.सारिका अनमुलवाड, डॉ.हाजरा फातेमा यांच्या प्रयत्नांने डॉ.रुबिया मॅडम,डॉ.सुर्यवशी सर,सुपरवायझर जाधव सि. एन,गादेवार सिस्टर, सावंत सिस्टर, निता सिस्टर, वर्षा देवकांबळे, करडे सिस्टर, कलुरे सिस्टर, साठे सिस्टर, पट्टेकर सिस्टर,महेश ठाकुर,पळसीकर,रत्नपारखे, खडके, गायकवाड रवि, गायकवाड मामा, तहसिन बानु, वंदना एगडे, पठान मामा, भालेराव, कदम वाहन चालक यांनी केलेल्या परिश्रमातून एकूण 35 महिलांची बिनटाक्याची कुटूंब कल्याण शस्त्रक्रिया पारपाडण्यात आले.यात आरळी उपकेंद्र 15, पिंपळगाव उपकेंद्र 6, कुंडलवाडी शहरी 7, अर्जापूर उपकेंद्र 3, हुनगुंदा उपकेंद्र 1 माचनुर उपकेंद्र 3 आदी भागातील महिलांचा समावेश आहे.
सर्वात जास्त आरळी उपकेंद्रातील महिलांना समुपदेश करून ऑपरेशन साठी प्रोत्साहीत करण्यात येथील उपकेंद्रातील आरोग्य सेविका शेशीकला सावंत,रविंद्र गायकवाड,आदींचा प्रयत्नाला यश आले.असे आकड्यावरून दिसायला मिळते हे विशेष बाब आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा