कुंडलवाडी प्रतिनिधी.
कुंडलवाडी वीज वितरण कार्यालयाचे अभियंता सुरेश गटुवार यांची भेट घेऊन नवीन मीटर बसविणे बंदकरा,वाढिव विजदर रद्द करा.अशा आशेचे निवेदन शहरातील नागरीकांचा एका शिष्टमंडळाने येथील विद्युत वितरण कार्यालयाचे कनिष्ठ अभियंता सुरेश गटुवार यांना दिले.
दिलेल्या निवेदनात असे नमुद करण्यात आले की,
आपल्या कार्यालय मार्फत गेल्या तीन महिण्यापुर्वी शहरातील शतरंजीगल्ली,खुरेशीगल्ली,बागवान गल्ली,भोई गल्ली,कुभार गल्ली,नरागल्ली अशा काही मोजक्या गल्लीत नवीन विद्युत मिटर बसविण्यात आले.
यासंदर्भात ग्राहकास कसल्याच प्रकारची पुर्व सुचना देण्यात आले नाही.
या नवीन मिटरची चे दर सामान्य नागरीकांना परवडणारे नाही.अव्वा की सव्वा लाईट बिल आकारण्यात येत आहे.या भागातील नागरीकांचे हातावर पोट आहे.अनेक नागरीकांना हजारो रूपय लाईट बिल आले आहे.घरात मानसे नसताना ही हजारो रूपय बिल येत आहे.यामुळे नागरीक परिवार सभाळावे की हजारो रूपय लाईट बिल भरावे.हे लाईट बिल न परवडणारे आहे.
तरी आम्हा सर्व नागरीकांचा घरी नवीन मिटर बसविणे बंद करा,वाढीव विजदर रद्दकरा जुनेच मिटर बसविण्यात यावे.अन्यथा लोकशाही मार्गाने जनआंदोलन करण्यात येईल.असा ईशारापण देण्यात आले.
यावेळी पत्रकार मोहम्मद अफजल हाजी ईब्राहीमसाब,शेख वहाब सिरजोदीन,लतिफ करीमसिब खुरेशी,शेख वहिद फयाजमियाॅ,शेख फसियोदीन म.मुलतानसाब,शेख अजिम ईबादमियाॅ,शेख आरीफ शादूलमियाॅ,शेख समिर अहेमद,शेख समिर युसूफ आदिजन उपस्थित होते.दिलेल्या निवेदनावर बागवान गल्ली,खुरेशी गल्ली,शतरंजीगल्लीतील नागरीकांचे स्वाक्षरी आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा