१६ जुलै २०२५

 

सहाय्यक संचालक (हिवताप) लातूर यांना संघटनेचे निवेदन सादर


नांदेड :- लातूर विभागीय सहाय्यक संचालक, आरोग्य सेवा (हिवताप) लातूर पदी डॉ.हणमंत डी.वडगावे साहेब रुजू झाल्या बदल नांदेड जिल्हा हिवताप, हत्तीरोग कर्मचारी संघटनेच्या वतीने सत्यजीत टिप्रेसवार जिल्हाध्यक्ष तथा राज्य कोषाध्यक्ष हिवताप कर्मचारी संघटना (मा. बाजीराव कांबळे साहेब) यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

 

नांदेड जिल्ह्यातील हिवताप, हत्तीरोग विभागातील कर्मचारी यांच्या प्रलंबित मागण्या बाबत चर्चा करण्यात आली व निवेदन देण्यात आले. आश्वासित प्रगती योजना (10,20 व 30 वर्ष) लाभ देय बाबत येत्या आठ दिवसात विभागीय समितीची बैठक आयोजित करण्यात येणार आहे व बैठक होताच काही दिवसात आदेश निर्गमित करण्यात येतील. आरोग्य कर्मचारी यांची दि.1.1.2025 रोजीची विभागीय जेष्ठता सूचि अद्याप पर्यंत प्रसिद्ध करण्यात आली नाही ती पण लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल, आरोग्य कर्मचारी संवर्गातून आरोग्य निरीक्षक पदी पदोन्नती, क्षेत्र कर्मचारीतून आरोग्य कर्मचारी पदी पदोन्नती करण्यात यावी या बाबत माहिती मागवून लवकरच पदोन्नती करण्यात येतील  असे मा.डॉ हणमंत वडगावे साहेब सहाय्यक संचालक आरोग्य सेवा (हिवताप) लातूर यांनी सांगितले. यावेळी श्री राहुल जाधव सहाय्यक अधिक्षक, श्रीमती शेटकार मॅडम होते. 

मा.डॉअमृत चव्हाण सर जिल्हा हिवताप व हत्तीरोग अधिकारी नांदेड, कैलास सावळे कार्यालयीन अधिक्षक, अशोक हरनाळीकर वरिष्ठ लिपिक, दिलिप राठोड लिपिक, मुकुंद देवकांबळे जिल्हा हिवताप कार्यालय नांदेड आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

बातम्या

सोयाबीन व कापूस या पिकांचे मोठ्या नुकसान झाले आहे या दोन पिकांसाठी सरसकट विमा लागू करावा- पांडूरंग शिंदे

               नांदेड जिल्ह्यातील विशेषतः नायगाव तालुक्यातील परतीच्या पावसाने हातात आलेले पीक गेल्याने शेतकरी हावादीन झाला आहे, दिवाळीच...