बिलोली.. हुतात्मा गोविंदराव पानसरे शिक्षण प्रसारक मंडळाचे पानसरे महाविद्यालय अर्जापूर येथे प्रा.डॉ. गोपाळ चौधरी ( मराठी विभाग) यांची कनिष्ठ महाविद्यालयात उपप्राचार्य म्हणून नियुक्ती केली आहे.तर पर्यवेक्षक पदी प्रा. एस एल गायकवाड यांची नियुक्ती केली आहे.प्रा.डॉ.गोपाळ चौधरी परभणी जिल्ह्यातील रहिवासी असून हे पानसरे कनिष्ठ महाविद्यालयात ऑगस्ट 1993 पासून मराठी विषयाचे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. तसेच महाविद्यालयातील विविध विभाग म्हणजेच सांस्कृतिक, कला ,क्रीडा, परीक्षा इत्यादी विभागात 1993 पासूनच कार्यरत असून बिलोली तालुक्यात व नांदेड जिल्ह्यात प्रसिद्ध व्यक्तिमत्व म्हणून नावारूपाला आलेले आहेत. भाषण,व्याख्यान, सूत्रसंचालन, संगीत ,नाटक,एकांकिका स्पर्धा लावणी महोत्सव, कीर्तन महोत्सव विविध संमेलने, शिबिरे यातून त्यांचा सक्रिय सहभाग राहिलेला आहे व असतो. हुतात्मा गोविंदराव पानसरे शिक्षण प्रसारक मंडळाने त्यांच्यावर ही अत्यंत महत्त्वाची जबाबदारी टाकली असून ती जबाबदारी ते उत्तमपणे पार पाडतील यात शंका नाही.त्यांच्या या नियुक्तीचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.या नियुक्तीबद्दल संस्थेचे अध्यक्ष नागनाथराव पाटील सावळीकर, सचिव सुनीलजी बेजगमवार, उपाध्यक्ष माजी आमदार गंगाधरराव पटणे, राजेश्वरजी उत्तरवार,माजी सचिव पंढरीनाथशेठ दाचावर,सुभाषरावजी गायकवाड, माजी अध्यक्ष बाळोजी पाटील,शालेय समितीचे प्रदीप अंबेकर संचालक प्रकाश अर्जुने व सर्व संचालकांनी तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर.जे गायकवाड उपप्राचार्य डॉ. गोविंद चौधरी तसेच वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक,प्राध्यापिका व महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी यांनी या निवडीबद्दल अभिनंदन केले आहे. व पुढील कार्यास जिल्ह्यातील व परिसरातील अनेक गणमान्य व्यक्तींनी, माजी विद्यार्थी व अधिकाऱ्यांनी तसेच विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा