अंतापूरकर आमदार होण्याचे सर्व श्रेय बिलोली देगलूरच्या जनतेलाच -साळुंके
नांदेड :-देगलूर विधानसभेच्या 2009 साली झालेल्या निवडणुकीत नौकरीचा राजीनामा देऊन आमदार झालेल्या रावसाहेब आंतापुरकरांना 2014 च्या निवडणुकीत अल्पशा मतांनी पराभव स्वीकारावा लागला तरी हा माझा पराभव नसून मीच या विधानसभेचा आमदार समजून अतिशय कटिंन प्रसंगातून बिलोली तालुका व देगलूर तालुक्यातील जनतेच्या नेहमी संपर्कात राहिल्याने व त्यांच्यावर माननीय अशोकरावजी चव्हाण यांनी विश्वास दाखवून 2019 च्या निवडणुकीत उमेदवारी देऊन आशीर्वाद दिल्याने येथील जनतेने विरोधकांच्या आर्थिक अमिषाला बळी न पडता अंतापूरकर याना निवडून दिल्याने ते आमदार होण्याचं सर्व श्रेय हे बिलोली देगलूर तालुक्यातील जनतेलाच जाते असे मत प्रदेश युवक काँग्रेसचे माजी सरचिटणीस केदार पाटील साळुंके यांनी व्यक्त केले आहे.
देगलूर विधानसभा मतदारसंघ हा 2009 साली अनुसूचित जाती जमातीसाठी राखीव झाल्याने येथील मतदारसंघावर अनेकांचे डोळे पडले त्यामध्ये शिवसेनेकडून सुभाष साबणे तर काँग्रेस पक्षाकडून तत्कालीन कॉंग्रेसच्या अनेक निष्ठावंतांना डावलून नवख्या असलेल्या मुंबई येथे नौकरीस कार्यरत असणाऱ्या रावसाहेब अंतापूरकर यांना उमेदवारी देण्यात आली त्यावेळी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर नांदेड चे भूमिपुत्र अशोकराव चव्हाण विराजमान असल्याने राजकारणात वल् आणि वाळलही जळणार अशा परिस्थितीत नौकरिष राजीनामा देऊन उभे टाकलेल्या अंतापुरकरांचा 6011 मतांनी विजय झाला त्या पाच वर्षात पुलाखालून कित्येक पाणी वाहून गेले आणि 2014 च्या निवडणुकीत अशोकराव चव्हाण मुख्यमंत्री पदावरून माजी मुख्यमंत्री झाले जिल्ह्यातील अनेक नेते पक्ष सोडून गेले आणि निवडणुकी अगोदर सहा महिने स्वतंत्र मिळालेल्या अंतापूरकराणी स्वतंत्र काँग्रेस पक्षात माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण यांचे नेतृत्व स्वीकारून निवडणुकीला सामोरे गेले मात्र त्यावेळी त्यांचा 8698 मतांनी पराभव करण्यात आला त्या पराभवानंतरही मीच या मतदारसंघाचा आमदार असल्याची भावना मनात बाळगून अतिशय हलाखीच्या परिस्थितीवर मात करत पाच वर्ष कसून मतदारसंघात मशागत केल्याने जनतेची सहानुभूती मिळाली तर चालू आमदारांनी मतदारसंघातील मशागती ऐवजी वाळूचे ट्रक घालून पार वाट लावून जनतेचा रोष ओढवून घेतला पैसा दिल्याने मतदार भुलतील या अपेक्षेने प्रचंड पैसा कमावला व निवडणुकीत पैशाचा पाऊसही पाढला तर अंतापूरकर यांच्याकडे आर्थिक परिस्थिती नसल्याने पैसेवाला उमेदवार येईल का अशी अनेक अन्य उमेदवाराची चर्चाही मधल्या काळात काँग्रेस पक्षात झाली मात्र अंतापूरकर यांची लोकांमधील सहानुभूती व माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचा अंतापूरकर यांना उमेदवारीरुपी मिळालेला आशीर्वादाच्या बळावर 2019 च्या निवडणुकीत विरोधी उमेदवारांनी पैशाचा अक्षरशा पाऊस पाडला असला तरी येथील बिलोली देगलूर तालुक्यातील जनता बळी न पडता रावसाहेब अंतापूरकर यांना 22440 हजार मतांनी निवडून दिले त्यामुळे माननीय अशोकरावजी चव्हाण यांचे उमेदवारी रूपी अंतापूरकर यांना मिळालेले आशीर्वाद आणि जनतेच्या प्रेमापोटी अंतापूरकर आमदार झाल्याने याचे सर्व श्रेय येथील जनतेला जाते असे मत प्रदेश युवक काँग्रेसचे माजी सरचिटणीस केदार पाटील साळुंके यांनी व्यक्त केले आहे

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा