अरळीतील पुरात पिता-पुत्र मृत्यू पावलेल्या कुटुंबाला 25 लाख मंजूर करा- केदार पाटील साळुंके
बिलोली :-तालुक्यातील आरळी येथे शेताकडे गेलेले शेतकरी शेख शादुल मेहबूब व त्यांचा मुलगा मेहराज शादुल शेख हे घराकडे परत येत असताना नाल्यास अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्याने त्यात वाहून दोघा पिता- पुत्राचा मृत्यू झाला घरचा कर्ता पुरुष गेल्याने कुटुंब उघड्यावर पडले आहे राहण्यासाठी पक्के घरही नाही अल्पभूधारक असलेल्या कुटुंबास शासनाने नैसर्गिक आपत्ती आपत्कालीन निधीतून तातडीची पंचवीस लक्ष रुपयांची मदत मंजूर करावी अशी मागणी अपर जिल्हाधिकारी श्री खुशालशिंह परदेशी यांच्याकडे निवेदन देऊन प्रदेश युवक काँग्रेसचे माजी सरचिटणीस केदार पाटील साळुंके यांनी केली आहे.
आरळी तालुका बिलोली येथील गावाच्या बाजूने जीगळा तळ्यावरुन मोठा नाला वाहत पुढे गोदावरी नदीला जाऊन मिळतो सदरील नाला ओलांडून शेतकरी आपल्या शेताकडे नेहमी ये-जा करत असतात त्याच पद्धतीने शेख शादुल मेहबूब वय 45 वर्ष हा शेतकरीही शेतातील सोयाबीन पाण्याने भिजत असल्याने ते झाकण्यासाठी आपल्या दहावीत शिकणाऱ्या मेहराज शेख यास शाळेला दिपवाळीच्या सुट्टया असल्याने मदतीस घेऊन नाला ओलांडून पलीकडे असलेल्या शेताकडे गेला सोयाबीन झाकून शेताकडे असलेले आपले बैल घेऊन परत गावाकडे येत असताना नाल्यातून पहिले बैल गावाकडील काठावर आणून बांधले त्यानंतर आपला मुलगा यास घेण्यासाठी परत शेता कडील कडेवर गेला मुलास घेऊन परत गावाकडील काठावर येत असताना नाल्यातील पाण्याचा प्रवाह वाढला आणि त्यात ते दोघे पितापुत्र वाहून त्यांचा मृत्यू झाला जेमतेम एक एकर आठ गुंठे कुटुंबात जमीन असलेला करता पुरूषच गेल्याने पूर्ण कुटुंब उघड्यावर पडलेले आहे तर त्या कुटुंबाकडे राहण्यासाठी पक्के घरही नाही अशा परिस्थितीत ते पूर्ण कुटुंब उघड्यावर पडले आहे त्या उघड्यावर पडलेल्या कुटुंबास शासनाने तातडीने नैसर्गिक आपत्ती आपत्कालीन निधीतून 25 लक्ष रुपयाची मदत करण्याची मागणी अप्पर जिल्हाधिकारी श्री खुशालशिंह परदेशी यांची भेट घेऊन लेखी मागणी प्रदेश युवक काँग्रेसचे माजी सरचिटणीस केदार पाटील साळुंके यांनी केली असून अपर जिल्हाधिकारी यांनी तातडीने बिलोली तहसीलदार यांना बोलून निधी मंजूर करण्याच्या सूचना केलेल्या आहेत.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा