माचनूर येथील लचमन्नाजी आकुलवार यांचे दिर्घ आजाराने निधन,राजकारणातील एक प्रामाणिक व विनम्र व्यक्तीमत्व हरवला
बिलोली - (सय्यद रियाज) बिलोली तालुकाक्यातील मौजे.माचनूर येथिल भुमीपुत्र लचमन्नाजी आकुलवार यांचे आज दुपारी 3.45 वाजता दिर्घ आजाराने निधन झाले मृत्यू समयी ते 90 वर्षाचे होते त्यांच्या पश्चात पाच मुली व नातवंडे असा मोठा परिवार आहे व अंत्यविधी दिनांक 29-06-2019 रोजी दुपारी 1.00 वाजता त्यांच्या मुळगावी माचनुर तालुका बिलोली येथे होणार आहे माचनुर नगरीचे पहीले सरपंच ई. स 1960 ते 1981 पर्यंत सतत 21 वर्ष सरपंच पद भुशविले
बिलोली पंचायत समितीचे सदस्य म्हणून इ.स 1981 ते 1991 पर्यंत सतत 11 वर्ष पंचायत समितीचे सदस्य म्हणून काम पाहिले कुंडलवाडी विविध सेवा सहकारी सोसायटीचे 10 ते वर्ष संचालक होते हु. गोविंदराव पानसरे अर्जापुर महाविद्यालय चे सतत 15 ते 20 वर्षापासून आजपर्यंत संचालक पदी विराजमान होते राजकीय पदे तर अनेक वर्ष भोगलेच पण त्यासोबतच बिलोली तालुक्याचे सुरमणी म्हणून 60 वर्षे भजन संगीताच्या माध्यमातून सुद्धा त्यांची ओळख होतीमाचनुर येथील सर्व सामान्य माणसाच्या मनात एक वैशिष्ट्य पुर्ण कायम स्थान मिळवलेला नेता आयुष्यभर स्मरणात राहील
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा