बिलोली
सध्याच्या कोरोना काळात विविध स्तरावरील कोरोना योध्याना मास्क व सँनिटायझरचे वाटप करण्यात येत आहे.माञ वृत्तपञ व मिडीयात काम करणाऱ्या प्रतिनिधींकडे सर्वांचे दुर्लक्ष होत होते.याच गोष्टीचा विचार करून संतोष कुलकर्णी मिञ मंडळाच्या वतीने बिलोली शहर व परिसरातील पञकारांना एन 95 मास्क,सँनिटायझर तहसिलदार विक्रम राजपूत यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
गेल्या चार महिन्यापासून सर्वञ कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे.या काळात काम करणाऱ्या डाँक्टर,प्रशासकीय अधिकारी /कर्मचारी व इतर लोकांचा विविध संघटनांच्या वतीने कोव्हीड योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला.माञ कोरोना सारख्या बिकट काळात नागरिक व प्रशासनातील दुवा म्हणून काम करणाऱ्या वर्तमानपञ व मिडीयाच्या प्रतिनिधींच्या कार्याची दखल घेण्यात आली नाही.हिच बाब लक्षात घेऊन माजी नगराध्यक्ष संतोष कुलकर्णी यांच्या संकल्पनेतुन दि.९ जुलै रोजी बिलोली शहर व परिसरातील पञकार व वृत्तपञ विक्रेत्यांना मास्क,सँनिटायझर वाटप करण्यात आले.यावेळी ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डाँ.नागेश लखमावार,पञकार गोविंद मुंडकर,नगर परिषदेचे उपाध्यक्ष मारोती पटाईत,गट नेते नागनाथ तुम्मोड,प्रकाश पोवाडे,अरूण उप्पलवार,लक्ष्मणन शेट्टीवार, .जी कुरेशी,राजेंद्र कांबळे,अमजद चाऊस,रत्नाकर जाधव,माधव एडके, बसवंत मुंडकर , शेख फारुख, शेख इलियास,सुनिल कदम,सतिष बळवंतकर,हर्ष कुंडलवाडीकर,मुकिंदर कुडके,शिवराज रायलवाड,शेख युनुस,वृत्तपञ विक्रेते सायलू नरोड,नागेश कोंडावार यांच्यासह शहर व परिसरातील पञकार उपस्थित होते. कार्यक्रमासाठी कुलकर्णी मिञ मंडळाचे नितीन देशमुख , वल्लीउद्दीन फारुकी, जावेद कुरेशी व अन्य सदस्यांनी परिश्रम घेतले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा