१० जुलै २०२०

कृषी पदवीधर युवाशक्ती संघटना मराठवाडा कार्याध्यक्ष पदी शिवव्याख्याते श्याम कपाळे



शिराढोण:  कृषी पदवीधर युवाशक्ती संघटनेच्या मराठवाडा कार्याध्यक्ष पदी कंधार तालुक्यातील शिराढोण येथील श्री. श्याम बालाजी पा. कपाळे यांची  संघटनेचे संस्थापक अध्यक्ष जयदीपदादा ननावरे, राज्यकार्याध्यक्ष प्रविण भैया आजबे ,मराठवाडा प्रदेशाध्यक्ष संकेत गरड व राज्य कार्यकारिणी यांचा सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली.
मराठवाड्यातील व परिसरातील  कृषी पदवीधरांचे व बळीराजाचे प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी व संघटनेचे विविध उपक्रम  राबविण्यासाठी कपाळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
  व्याख्यानाच्या माध्यमातून शिव- फुले-शाहू-आंबेडकरांचे विचार तळागाळात पोहोचवण्याचे कार्य ते करतात.
त्यांच्या ह्या निवडीमुळे भीमाशंकर विद्यालयाचे प्राचार्य तथा उपसरपंच खुशाल पाटील पांडागळे, माजी उपसरपंच साईनाथ पाटील कपाळे, माली पाटील व्यंकटराव पाटील पांडागळे,मेजर किशन कपाळे साहेब ,प्रशांत पाटील कपाळे, पत्रकार शुभम डांगे, सुनील भरे, दौलत पांडागळे आदींनी अभिनंदन केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

बातम्या

सोयाबीन व कापूस या पिकांचे मोठ्या नुकसान झाले आहे या दोन पिकांसाठी सरसकट विमा लागू करावा- पांडूरंग शिंदे

               नांदेड जिल्ह्यातील विशेषतः नायगाव तालुक्यातील परतीच्या पावसाने हातात आलेले पीक गेल्याने शेतकरी हावादीन झाला आहे, दिवाळीच...