१४ जुलै २०२०

कोरोना रूग्णाचे वर्तमानपत्र व सोशल मिडीयात नाव जाहिर करणाऱ्या"त्या" व्यक्तीवर कारवाई करण्याचे आदेश


 बिलोली
        शहरातील एका व्यक्तीवर  कोरोनाची बाधा झाल्यानंतर त्या कोरोना बाधित व्यक्ती  चे नाव एका कार्यक्रमातील फोटोसह सोशल मिडीया व वर्तमानपञात प्रसारीत करण्यात आले.कोरोना बाधित वेक्तीचे नाव प्रसारीत करणाऱ्या त्या" वार्ताहारावर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधितांना दिल्याची माहिती देण्यात आली आहे.
    देशासह राज्यात आढळून आलेल्या कोरोना पाँझिटीव्ह  रूग्णांसाठी शासनासह वैद्यकीय विभाग दिवसराञ परिश्रम घेत आहे.कोरोना रूग्ण बरा व्हावा यासाठी विविध प्रकारचे प्रयोग शासन राबवत असून पाँझिटीव्ह रूग्णाचे आजारा विरूध्द लढण्यासाठी मनोबल वाढविण्याचा प्रयत्न करत आहे.कोरोना बाधित रूग्णाचे नाव जाहिर होऊ नये या उद्देशाने शासनाकडून योग्य ती खबरदारी घेण्यात येत असताना बिलोली शहरातील एका वेक्तीने काही दिवसांपुर्वी स्वतः हून आपला स्वँब तपासणीसाठी दिला होता.तपासणी साठी दिलेल्या स्वँब चा दोन दिवसांनी पाँझिटीव्ह अहवाल प्राप्त झाला.अहवाल प्राप्त होताच त्या वेक्तीने स्वतः  केअर सेंटर येथे दाखल करण्यात आले.कोरोना पाँझिटीव्ह रूग्णावर केअर सेंटरमध्ये उपचार सुरू असताना शहरातील काही जनांकडून त्या कोरोना पाँझिटीव्ह वेक्तीचे नाव एका कार्यक्रमातील फोटोसह सोशल मिडीया व एका वर्तमानपञात प्रसारीत करण्यात आले.सोशल मिडीया वर नाव जाहीर झाल्यामुळे  उपचार घेत असलेल्या  कोरोना पाँझिटीव्ह वेक्तीस परिणाम जाणवत असल्याने नाव जाहिर करणाऱ्या "त्या" वार्ताहारावर कारवाई करण्याचे आदेश संबधितांना जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.तसा संदेश प्राप्त झाल्याचे सांगण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

बातम्या

सोयाबीन व कापूस या पिकांचे मोठ्या नुकसान झाले आहे या दोन पिकांसाठी सरसकट विमा लागू करावा- पांडूरंग शिंदे

               नांदेड जिल्ह्यातील विशेषतः नायगाव तालुक्यातील परतीच्या पावसाने हातात आलेले पीक गेल्याने शेतकरी हावादीन झाला आहे, दिवाळीच...