बिलोली
गेल्या काही दिवसापुर्वी स्वतः हून कोरोनाची चाचणी करण्यासाठी स्वँब दिलेल्या शहरातील एका जेष्ठ पञकाराचा कोरोना रिपोर्ट पाँझिटीव्ह आला होता.स्वँबचा अहवाल पाँझिटीव्ह आल्यानंतर स्वत कोव्हीड सेंटरला दाखल झालेल्या त्या जेष्ठ पञकाराने कोरोनावर मात केली. काही दिवसाच्या उपचारासाठी देखरेखीखाली होते.
जगभरातील विविध देशासह भारतात कोरोनाचे रूग्ण आढळू लागताच केंद्र व राज्य शासनाच्या वतीने मार्च महिन्यात पहिल्यांदा लाँकडाऊन करण्यात आले.या लाँकडाऊनची स्थानिक पातळीवर महसुल,पोलिस,आरोग्य,नगर परिषद प्रशासनाच्या वतीने प्रभावी अमलबजावणी करण्यात येत असताना त्या जेष्ठ पञकाराने लगतच्या तेलंगणा राज्यातुन बिलोली तालुक्यात कोरोना विषाणूचा प्रसार होऊनये यासाठी जिल्हाधिकारी व पोलिस अधिक्षकांच्या संपर्कात राहून शहरातील राज्य महामार्गावरून शहरात जाणारे जोड रस्ते बंद करण्यासाठी सर्वप्रथम पुढाकार घेतला होता.तद्नंतर सिमावर्ती भागात असलेल्या काही प्रमुख गावातील सरपंच व पोलिस प्रशासनाशी संवाद साधून तेलंगणातुन छुप्या पद्धतीने ये जा करणाऱ्यांवर आळा बसविण्यासाठी सिमावर्ती भागातील गावांमध्ये सि.सि टिव्ही कँमेरे बसविण्याचा उपक्रम राबविला होता. शहर विकास कृती समितीच्या माध्यमातून शहरातील व बाहेर गावाहून येणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याची काळजी व त्यांना हात धुण्याची सवय लागावी यासाठी गर्दीच्या ठिकाणी हात धुण्यासाठी हँन्ड वाँश व पाण्याची सोय करणे असो की गल्ल्या गल्यांमध्ये जंतुनाशकाची फवारणी करणे असो अशा अनेक उपक्रमांसाठी त्यांनी पुढाकार घेतला होता.शहरात कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी काही उपक्रमात सहभागी होणाऱ्या त्या जेष्ठ पञकारास दुर्दैवाने कोरोना विरोधात लढावे लागले.स्वतः ची जबाबदारी ओळखून कोरोनाचे लक्षण नसतानाही त्या जेष्ठ पञकाराने स्वतःच आपला स्वँब तपासणीसाठी स्वतः दिला होता.त्या स्वँबचा अहवाल पाँझिटीव्ह आल्यानंतर ते स्वत बिलोली येथील कोव्हीड केअर सेंटर येथे दाखल झाले.केअर सेंटर येथे काही दिवस उपचार घेतल्यानंतर कोरोनावर मात करून आज ते आपल्या घरी निघाले.कोरोना अहवाल पाँझिटीव्ह आल्यानंतर जिल्ह्यासह अन्य काही जिल्ह्यातील विविध क्षेञातल्या अनेक मिञ मंडळींनी त्यांच्याशी संपर्क साधून कोरोना विरूध्द मुकाबला करण्यासाठी प्रोत्साहन दिले. त्या सर्व मिञ परिवारासह वैद्यकीय अधिक्षक, व कोव्हीड केअर सेंटरमध्ये त्यांची काळजी घेणाऱ्या आरोग्य विभागाच्या सर्व अधिकारी,कर्मचाऱ्यांचे त्यांनी आभार मानले आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा