नांदेड/धर्माबाद(सय्यद रियाज )
सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाअंतर्गत डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे च्या वतीने बिलोली तालुका समतादूत शेख इर्शाद मौलाना यांनी वीटभट्टी कामगारांशी संवाद साधून शिक्षणाचे महत्व पटवून दिले .व उपस्थित विद्यार्थ्यांचा शैक्षणिक सर्वेक्षण करण्यात आले .शिक्षणाचा गंधही नसलेल्या या कामगारांची अनेक मुले आज शिक्षणाचे धडे गिरवत आहेत.
बार्टी पुणे तर्फे संपूर्ण महाराष्ट्रात सामाजिक ,सांस्कृतिक व शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येत आहेत त्याचाच एक भाग एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये याकरिता वाडी ,तांडा ,वस्ती , अशा अनेक ठिकाणी समतादूत पोहचत आहे .व विद्यार्थ्यांना शाळा प्रवेश करून दिला जात आहे त्या अनुषंगाने शेख आय.एम.यांनी शेळगाव येथे वीटभट्टी कामगार यांच्याशी संवाद साधला व शिक्षणाचे महत्व पटवून दिले .
वीटभट्टी कामगार म्हणजे, समाजातील एक दुर्लक्षित घटक. वीटभट्टीवर काम करण्यासाठी संपूर्ण कुटुंबच स्थनांतरित होत असल्याने त्यांच्या मुलांना शिक्षणापासून वंचित राहावे लागते. ऑक्टोबर ते मे दरम्यान हे कामगार कुटुंबीयांसह वीटभट्टीवर, तर जून ते सप्टेंबरमध्ये आपापल्या मुळ गावी राहून शेतमजुरी करतात, त्यामुळे त्यांच्या मुलांची गावातील शाळेत कागदोपत्री नोंद असली तरी, ती वर्षभर शिक्षण घेऊ शकत नाही.या कामगारांच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न संपूर्ण राज्यातील प्रत्येक जिल्ह्य़ात निर्माण झालेला असल्याने याबाबत शासनाने धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज आहे.
विशेष म्हणजे शेख इर्शाद मौलाना यांनी बिलोली तालुक्यातील शिक्षणापासून वंचित असलेल्या घटकापर्यंत पोहचून त्यांना शाळा प्रवेश करण्याचे महत्वाचे कार्य करत आहेत .पोखर्णी फाटा येथील चित्तोडिया समाजातील एकूण ०७ विद्यार्थ्यांना शाळा प्रवेश व विजयनगर येथील वैदू समाजातील एकूण १० विद्यार्थ्यांना शाळा प्रवेश व लोहगाव येथील चित्तोडिया समाजातील एकूण १५ मुलांना जिल्हा परिषद शाळा लोहगाव येथे शाळा प्रवेश करून दिले आहे .सदर शाळा प्रवेश करण्यासाठी नांदेड जिल्हा प्रकल्प अधिकारी सौ.सुजाता पोहरे यांनी वेळोवेळी बिलोली तालुक्यातील शिक्षणापासून वंचित असलेल्या घटकाला भेट दिलेली आहे .सदर उपक्रम राबविण्यासाठी बार्टी च्या मुख्य प्रकल्प संचालिका मा.प्रज्ञा वाघमारे व नांदेड च्या जिल्हा प्रकल्प अधिकारी तसेच सहाय्यक प्रकल्प संचालिका सौ.सुजाता पोहरे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात येत आहेत .
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा